बॉलिवूडमधील गंमतीशीर संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2016 9:12 PM
बॉलिवूडमध्ये एकेकाळी मेरे पास माँ है सारखे डॉयलॉग्ज होते. आता इतक्या बेफिक्रे पद्धतीचे डायलॉग्ज येत आहेत की, सांगता येत ...
बॉलिवूडमध्ये एकेकाळी मेरे पास माँ है सारखे डॉयलॉग्ज होते. आता इतक्या बेफिक्रे पद्धतीचे डायलॉग्ज येत आहेत की, सांगता येत नाही. बॉलीवूडमध्ये चांगले संवाद अनंतकाळ टिकतात याची अनेक उदाहरणे आहेत. अलीकडे चांगल्या संवाद लेखकाची फारशी वानवा नाही. तरी देखील काही चित्रपटात असे विनोदी डायलॉग्ज येतात की, प्रेक्षकांना हसू आल्याशिवाय राहत नाही. अशाच काही चित्रपटातील संवादाची माहिती या ठिकाणी देत आहोत.वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटात मजेदार डायलॉग्ज असतात. त्यामुळे अक्षयच्या अशा चित्रपटात तुम्हाला हमखास विनोदी संवाद दिसून येतील. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा चित्रपटात असाच एक मजेशीर डायलॉग आहे. ‘हिरो मरने के बाद स्वर्ग जाता है, और व्हिलन जीते जी स्वर्ग पाता है’दबंग २ सलमान खानच्या चित्रपटातही अशा खमंग आणि दणकेबाज डायलॉग्जची भरमार असते. दबंग २ चित्रपटात असे अनेक मजेदार संवाद आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘स्वागत नही करोगे आप आम्हारा’ आता स्वागत करा असे म्हणणे गंमतशीर नव्हे का?मै तेरा हिरो वरुण धवनचा मै तेरा हिरो या चित्रपटातील एक डायलॉग्ज फार मजेशीर आहे. ‘मैं दिखता हुँ इनोसंट, स्वीट, स्वामी टाईप का, लेकिन अॅक्चुअली हुँ बडे हरामी टाईप का’ आता नेमका वरुण कसा आहे, या संवादातून काही कळत नाही.वॉन्टेड सलमानचा आणखी एक गंमतशीर संवाद. ‘तू लडकी के पिछे भागेगा. लडकी पैसे के पिछे भागेगी. तू पैसे के पिछे भागेगा, लडकी तेरे पिछे भागेगी.’ पैशासंदर्भात हा संवाद असला तरी तो खूपच मजेदार आहे.आशिकी २ आशिकी २ या चित्रपटात आदित्य रॉय कपूरचा खूप गंमतशीर संवाद आहे. ‘मैं मरने के लिए नही पिता.. पिने के लिए मरता हुँ’ लोक पिताना देखील असे विनोदी संवाद म्हणतात हे ही गंमतीशीर.वन्स अपॉन टाईम इन मुंबई इम्र्रान हश्मीचा या चित्रपटातील मजेशीर संवाद. ‘मुश्किल तो ये है की मैं अभी ठीक तरह से बिगडा भी नही, और तुमने सुधारना शुरू कर दिया’ आता नेमके इम्रानला काय म्हणायचे आहे, हे लक्षात येत नाही.