‘पद्मावती’चे भविष्य २८ नोव्हेंबरला होईल निश्चित..!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 7:33 AM
निर्माता संजय लीला भंसालीचा चित्रपट ‘पद्मावती’ च्या अडचणी थांबतच नाही आहेत. एका नंतर एक अडचणी भंसाली समोर येत आहेत. ...
निर्माता संजय लीला भंसालीचा चित्रपट ‘पद्मावती’ च्या अडचणी थांबतच नाही आहेत. एका नंतर एक अडचणी भंसाली समोर येत आहेत. हा चित्रपट यूकेमध्ये रीलिजसाठी सर्टिफिकेट मिळाले होते, मात्र याविरोधातही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, संजल लीला भंसालीचा ‘पद्मावती’च्या देशाबाहेर रीलिज होण्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर २८ नोव्हेंबर रोजी निर्णय घेण्यात येईल. मुख्य न्यायाधिश न्यायमूर्ति दीपक मिश्रा, न्यायमूर्ति ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ति डी.वाई. चंद्रचुड यांनी या याचिकेवर निर्णय घेण्याचे ठरविले आहे. याचिकाकर्ताने असे म्हटले आहे की, ‘जर देशाबाहेर चित्रपटाला रीलिज करण्यात आले तर याचे गंभीर परिणाम होऊन समाजाला नुकसान पोहचू शकते.’ न्यायालयात याविषयीचा निकाल मंगळवारी देण्यात येणार असून पद्मावतीचे भविष्य म्हणजे हा चित्रपट रीलिज होऊ शकतो की नाही हे त्याच दिवशी समजेल. याचिकाकर्ता अॅड. एम.एल. शर्मा यांनी निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निर्मात्यांनी हे सांगून तथ्यांशी छेडखानी केली आहे की, चित्रपटातील गाणे आणि प्रोमोला केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (सीबीएफसी) ने हिरवा झेंडा दिला आहे. याअगोदर न्यायालयाने या चित्रपटाशी संबंधीत शर्माच्या याचिकेला रद्द केले होते आणि म्हटले होते की, ‘सीबीएफसी’ला या चित्रपटाविषयी निर्णय घ्यायचा आहे. शर्माने त्यावेळी याचिकेद्वारा, हा चित्रपट रीलिज होऊ देऊ नये, वादग्रस्त दृष्य काढणे तसेच भंसालीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यात राणी पद्मावतीला 'नृत्यांगना' म्हणून दाखविण्यात आली असून त्यावरुन आरोप करण्यात आले आहेत की, या चित्रपटात पद्मावतीच्या बाबतीत चुकीचे तथ्य दाखविण्यात आले आहे. भारतात हा चित्रपट १ डिसेंबर रोजी होणार होता, मात्र वाढता विरोध पाहता ही तारीख स्थगित करण्यात आली. ब्रिटिश बोर्ड आॅफ फिल्म क्लासिफिकेशन (बीबीएफसी) ने या चित्रपटाला १ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात अनुमती दिली आहे, मात्र अधिकृत सूत्रांनुसार असे समजते की, हा चित्रपट १ डिसेंबर रोजी कुठेच रीलिज होऊ शकत नाही. Also Read : १ डिसेंबरला रिलीज होणार नाही ‘पद्मावती’, वाढत्या विरोधामुळे निर्मात्यांनी घेतला निर्णय!