Join us

बंगल्याच्या लिलावाप्रकरणी सनी देओलने अखेर सोडलं मौन, म्हणाला, "प्रयत्न करतोय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 9:20 AM

गदर २ च्या यशानंतर सनी देओलच्या बंगल्याला नोटीस आली होती.

सनी देओल (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) चं यश एन्जॉय करत असतानाच त्याच्यासाठी एक वाईट बातमी आली. जुहू येथील त्याच्या बंगल्याचं कर्ज न फेडल्याप्रकरणी बंगल्याचा लिलाव होणार अशी नोटीस आली. बँक ऑफ बडोदाने ही जाहिरात छापली आणि चर्चेला उधाण आलं. मात्र दुसऱ्याच दिवशी बँकेने लिलाव होणार नाही असं जाहीर करत यू टर्न घेतला. या सर्व प्रकारावर अखेर सनी देओलने मौन सोडलं आहे. 

नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाला, 'मी विनंती करतो या प्रकरणात काहीही अंदाज लावू नका. आम्ही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच यावर तोडगा निघेल.' सोबतच सनी देओलने पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले. यामुळे गदर २ नंतर सनी देओलच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच बदल होताना दिसत आहेत.

२५ सप्टेंबरला होणार होता लिलाव

सनी देओलचा जुहू येथे 'सनी व्हिला' आहे. या सहा मजली बंगल्याचं 56 कोटींचं कर्ज न फेडल्याप्रकरणी बँक ऑफ बडोदाकडून त्याला नोटीस आली. २५ सप्टेंबरला बंगल्याचा लिलाव करण्यात येईल अशी जाहिरातही बँकेने छापली. मात्र दुसऱ्याच दिवशी बँकेने जाहिरात मागे घेत लिलाव रद्द झाल्याचं सांगितलं. 

टॅग्स :सनी देओलबँकबॉलिवूडमुंबई