सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'गदर 2' चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. चाहते सनी देओलच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर शुक्रवारी त्यांची प्रतीक्षा संपली आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजपासून ते अॅडव्हान्स बुकिंगपर्यंत 'गदर २'चा जलवा पाहायला मिळत आहे. दरम्यान, गदर 2 चे पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. ज्यामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळलं आहे.
सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 30-35 कोटींचा व्यवसाय केला. हे अंदाजे आकडे आहेत. पण सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 ने पहिल्या वीकेंडला चांगली कमाई केली आहे, असे सर्व ट्रेड अॅनालिस्ट्सचे मत आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले की त्यांनी गदर 2 साठी खूप कमी VFX वापरले आहेत. त्याने चित्रपटातील बहुतेक दृश्ये वास्तविक चित्रित केली, ज्यासाठी अनिल शर्माने अनेक पद्धतींचा अवलंब केला.
अनिल शर्माने सांगितले आहे की त्यांनी चित्रपटात नगण्य पीएफएक्स वापरला आहे. गदर 2 मध्ये अॅक्शन सीन खरा करण्यासाठी, त्याने 500 हून अधिक बॉम्बस्फोट केले आणि 30-40 गाड्या उडवल्या. एवढेच नाही तर गर्दी दाखवण्यासाठी 4-5 हजार लोकांचा जमावही जमावला.
शक्तिमान तलावर लिखित 'गदर 2' या सिनेमाची मूळ कथा तारासिंग आणि त्याच्या मुलाभोवती फिरते. सिनेमाच्या पहिल्या भागात कथा अत्यंत संथ गतीने पुढे सरकते. परंतु, दुसऱ्या भागात ही कथा स्पीडमध्ये पुढे गेली आहे. सिनेमाच्या कथानकाला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे. 'गदर 2' चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.