बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2'चा (Gadar 2) बॉक्सऑफिसवरील धुमाकूळ अजूनही सुरुच आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमा अजून बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत ‘गदर २’ बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. सनी देओलच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत होते. आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. ‘गदर २’चे शो हाऊसफूल होत आहेत
पहिल्याच दिवसापासून चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सनी पाजीच्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आहे. अवघ्या 12 दिवसांत या चित्रपटाने 400 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपट 22 ऑगस्ट म्हणजेच 12 व्या दिवशी 11 कोटींचा बिझनेस केला असून सिनेमाने 400 कोटींचा आकडा पार केला आहे.
पहिल्या दिवशी 40.1 कोटीदुसऱ्या दिवशी 43.08 कोटी तिसऱ्या दिवशी 51.7 कोटीचौथ्या दिवशी 38.7 कोटी पाचव्या दिवशी 55.4 कोटीसहाव्या दिवशी 32.37 कोटीसातव्या दिवशी 23.28 कोटी एका आठवड्याचे एकूण कलेक्शन 284.63 कोटीआठव्या दिवशी 20.5 कोटीनवव्या दिवशी 31.07 कोटीदहाव्या दिवशी 41 कोटीअकराव्या दिवशी 13.50 कोटी बाराव्या दिवशी 11 कोटी
. 'गदर 2' हिट होण्याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त सिनेमा नाही तर लोकांसाठी ते एक इमोशन आहे. तसंच मेकर्सने जून महिन्यात 'गदर एक प्रेम कथा' पुन्हा थिएटर्समध्ये रिलीज केला होता. याचाही सिनेमाला फायदा झाला. सध्या प्रेक्षकांमध्ये केवळ सनी पाजीची क्रेझ दिसून येतेय.