Join us

अमिषा पटेलने केलेल्या आरोपांवर 'गदर 2'च्या दिग्दर्शकाने सोडले मौन, म्हणाले-ती असं का म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 9:37 AM

अमिषा पटेलने अलीकडेच दिग्दर्शक अनिल शर्मांवर गंभीर आरोप केले होते.

सनी देओल आणि अमिषा पटेलच्या 'गदर २' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. अमिषा पटेलने अलीकडेच दिग्दर्शक अनिल शर्मांवर गंभीर आरोप केले होते. अमिषा पटेलने 'गदर 2'च्या सेटवर अनिल शर्मा आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला होता.  काही आठवड्यांपूर्वी, अमिषा पटेलने दावा केला होता की चंदीगडमधील 'गदर 2' च्या सेटचे व्यवस्थापन खराब होते आणि थेट अनिल शर्मांच्या प्रॉडक्शन हाऊसला यासाठी जबाबदार ठरवले होते.

आता अनिल शर्मा यांनी अमिषाच्या आरोपांवर मौन सोडले आहे. अनिल शर्मा यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती असे का म्हणाली याची मला कल्पना नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की, हे सर्व खोटे आहेत, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.

अनिल शर्मा पुढे म्हणाले, 'मला अमिषा पटेलचे आभार मानायचे आहेत. तिने माझ्या प्रॉडक्शन हाऊसला प्रसिद्धी मिळवून दिली. यापेक्षा महत्त्वाचे काय असू शकते? नवीन प्रॉडक्शन हाऊस प्रसिद्ध केल्याबद्दल मी तिचे आभार मानतो.

अमिषाने ट्विट करून गदर २ च्या प्रॉडक्शन हाऊसवर आरोप केले होते. मेकअप आर्टिस्ट, डिझायनर आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याने ट्विटमध्ये लिहिले - पगाराव्यतिरिक्त, या सर्वांना शूटिंग दरम्यान झालेल्या खर्चाचे पैसे आणि फ्लाइट तिकिटांचे बिल मिळाले नाही. शुटिंगसाठी आलेले अनेक लोक होते, ज्यांच्यासाठी गाडी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, त्यामुळे ते रस्त्यावरच अडकले होते. त्यानंतर सर्व अडचणी पाहून झी स्टुडिओने याप्रकरणी कारवाई करत सर्वांचे पैसे भरले.

गदर २ मध्ये अमिषा पटले आणि सनी देओल यांच्याशिवया दिग्दर्शकाचा मुलगा उत्कर्ष शर्माही 'गदर 2' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. उत्कर्षने 2001 मध्ये आलेल्या 'गदर' चित्रपटात मुलाची भूमिका साकारली होती. गदर 2 11 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अमिषा पटेलसनी देओल