Join us

"सनी देओल पण ६५ वर्षांचा आहे", वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना अमिषा पटेलने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 14:23 IST

Gadar 2 : अभिनेत्रींच्या वयावरुन बोलणाऱ्यांना अमिषा पटेलने सुनावले खडे बोल, म्हणाली...

अमिषा पटेलच्याबॉलिवूड करिअरमधील 'गदर' सिनेमातील सकिना हे पात्र विशेष गाजलं. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. तब्बल २२ वर्षांनी सकिना पुन्हा एकदा 'गदर २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'गदर २'च्या सक्सेसनंतर अमिषा अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अशाच एका मुलाखतीत अमिषाने सनी देओलबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. 

अमिषाने नुकतंच 'न्यूज १८'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अभिनेत्रींच्या वयाबाबतही भाष्य केलं. या मुलाखतीत तिला "२०-२५ वर्षांची अभिनेत्री असेल तरच चित्रपट हिट होईल, हा स्टिरोयोटाइप आता मोडला आहे", असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना अमिषाने वयावरुन हिणवणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. 

"मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो", 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, "एखादी फ्रेंच बाई..."

"वय हा फक्त एक नंबर आहे. टॅलेंटला कोणतीच सीमा नसते. मग यामध्ये वय अडथळा कसा होईल? सनी देओल पण ६५ वर्षांचा आहे. पण, या वयातही मुख्य भूमिका साकरुन त्याने बॉक्स ऑफिसवर सगळ्यांना फेल केलं," असं अमिषा म्हणाली. 

"याने देशाची प्रगती होणार का?", देशाचं नाव भारत करण्यावरुन प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचं संतप्त ट्वीट

दरम्यान, 'गदर २'मध्ये सकिनाची भूमिका साकारलेली अमिषा ४७ वर्षांची आहे. सनी देओल मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या चित्रपटाने २४ दिवसांतच ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.  अमिषाने गदर २च्या दिग्दर्शकावर आरोप केल्यामुळे ती चर्चेत आली होती. 

टॅग्स :अमिषा पटेलसनी देओलबॉलिवूड