Join us

'लहानपणापासूनच चित्रपटांची आवड, घराणेशाहीमुळे मी...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाला 'गदर 2' फेम अभिनेता उत्कर्ष शर्मा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:40 AM

बॉलिवूडमध्ये चांगल्या कलाकारांना डावलून नेपो बेबीजला प्राधान्य दिले जाते, असा आरोप बऱ्याचदा केला जातो.

बॉलिवूड अन् नेपोटिझमच नातं हे खुपच जूनं आहे. बॉलिवूडमध्ये चांगल्या कलाकारांना डावलून नेपो बेबीजला प्राधान्य दिले जाते, असा आरोप बऱ्याचदा केला जातो. हाच आरोप 'गदर 2' फेम अभिनेता उत्कर्ष शर्मावरही करण्यात येतो.  अभिनेता उत्कर्ष शर्माने त्याचे वडील अनिल शर्मा दिग्दर्शित गदर (2001) या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयात प्रवेश केला होता. त्यानंतर तो वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या 'जिनियस' आणि 'गदर 2' चित्रपटांमध्ये दिसला. आता तो वडिलांच्या दिग्दर्शनाखाली त्याचा पुढचा चित्रपट 'जर्नी'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  नुकतेच एका मुलाखतीमध्येत त्यानं नेपोटिझमवर भाष्य केलं.  

घराणेशाहीच्या आरोपांवर उत्तर देताना तो म्हणाला, 'मला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड आहे. नेपोटिझम असं म्हणत लोक टीका करत असले, म्हणून मी माझी आवड सोडू शकत नाही. टीका योग्य असेल तर शिकायला मिळते. मला अनावश्यक नकारात्मकतेची पर्वा नाही'. वडिलांच्या दिग्दर्शनाखाली पुढचा चित्रपट करण्याबाबत उत्कर्ष म्हणाला, 'कथा लिहिल्यापासून मी त्याच्याशी जोडले गेलो आहे. कथेत माझ्या वयाच्या अभिनेत्याची मागणी होती. मला ती भूमिका समजली. त्यामुळे नायकाची भूमिका मीच करणार हे परस्पर समजूतदारपणाने ठरलं'.

तारा सिंह आणि सकिना यांची प्रेमकहाणी 'गदर' हा 2000 साली खूप गाजला होता. गेल्या वर्षी 22 वर्षांनंतर जेव्हा त्याचा सिक्वेल रिलीज झाला, तेव्हा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये तीच क्रेझ पाहायला मिळाली. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांची गर्दी होऊ लागली. 'गदर 2' मध्ये उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत होता. उत्कर्षने सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारली होती.त्यांची भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा