नवी दिल्ली - सनी देओलचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'गदर २' चित्रपट अखेर ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. चाहते सनी देओलच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, शुक्रवारी त्यांची प्रतीक्षा संपली. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजपासून ते अॅडव्हान्स बुकिंगपर्यंत 'गदर २'चा जलवा पाहायला मिळत आहे. दरम्यान, गदर २ चे पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन तब्बल ४० लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. सनी पाजीच्या पहिल्याच चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळाल्याने चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करेल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे आता देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींचा व्यवसाय केला. स्वत: सलमान खानने ट्विट करुन सनी देओलचं कौतुक करत ही माहिती दिलीय. ढाई किलो के हाथ ४० करोड की ओपनिंग के समान है, असे सलमानने म्हटले आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ ने पहिल्या वीकेंडला चांगली कमाई करत असून १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशभरातही देशभक्तीचा फिव्हर आहे, तसेच, जोडून सुट्ट्या आल्याने चित्रपटगृह हाऊसफुल्ल होत आहेत. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींनीही चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आज तकशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. आम्ही काल बसलो होतो, तेव्हा सेन्सॉर बोर्डातून आम्हाला फोन आला. त्यावेळी, तिकडून सांगण्यात आलं की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गदर २ चित्रपट पाहू इच्छित आहेत. त्यानंतर, त्यांनी आम्हाला ई-मेलही केला. त्यामुळे, आम्ही सर्वजण खूपच खुश आहोत, आनंदाने नाचू लागलो. कारण, गदर २ चित्रपटाला एवढा मोठा सन्मान मिळत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असे अनिल शर्मा यांनी म्हटलं.
दरम्यान, रविवारी आम्ही सर्वजण राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत, त्यांच्यासमवेत हा चित्रपट पाहणार आहोत. राष्ट्रपती हाऊसमध्येच सर्वजण हा चित्रपट पाहतील, असेही शर्मा यांनी सांगितले.
व्हीएफएक्सचा वापर कमी, वास्तवता अधिक
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले की त्यांनी गदर २ साठी खूप कमी VFX वापरले आहेत. त्याने चित्रपटातील बहुतेक दृश्ये वास्तविक चित्रित केली, ज्यासाठी अनिल शर्माने अनेक पद्धतींचा अवलंब केला. अनिल शर्माने सांगितले आहे की त्यांनी चित्रपटात नगण्य पीएफएक्स वापरला आहे. गदर २ मध्ये अॅक्शन सीन खरा करण्यासाठी, त्याने ५०० हून अधिक बॉम्बस्फोट केले आणि ३०-४० गाड्या उडवल्या. एवढेच नाही तर गर्दी दाखवण्यासाठी ४-५ हजार लोकांचा जमावही जमावला.
तारासिंगची प्रेमकथा
शक्तिमान तलावर लिखित 'गदर २' या सिनेमाची मूळ कथा तारासिंग आणि त्याच्या मुलाभोवती फिरते. सिनेमाच्या पहिल्या भागात कथा अत्यंत संथ गतीने पुढे सरकते. परंतु, दुसऱ्या भागात ही कथा स्पीडमध्ये पुढे गेली आहे. सिनेमाच्या कथानकाला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे. 'गदर २' चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.