Join us

रिलीज होताच लीक झाला गदर 2, याचा परिणाम होणार चित्रपटाच्या कमाईवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 2:47 PM

सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'गदर 2' रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे.

सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'गदर 2' चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. चाहते सनी देओलच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर शुक्रवारी त्यांची प्रतीक्षा संपली आहे. 'गदर 2' हा चित्रपट लोकांना आवडला असून त्याचे दृश्य सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच निर्मात्यांसाठी एक  समोर आली आहे. या बातमीचा परिणाम निर्मात्यांसह चित्रपटांच्या कलाकारांवरही होणार आहे.  सनी देओलचा चित्रपट 'गदर 2' रिलीज झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन लीक झाला आहे. सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाला पायरसी साइट्सचा मोठा फटका बसला असून त्याचा परिणाम कमाईवर होणार आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर 2' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची इतकी क्रेझ होती की 20 लाख तिकिटांची आगाऊ विक्री झाली. त्याचबरोबर 'गदर 2' चित्रपटाला लोक खूप पसंत करत आहेत, हे सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादावरून कळू शकते. मात्र याचदरम्यान 'गदर 2' चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट अनेक साइटवर ऑनलाइन लीक झाला आहे. यामुळे चित्रपटाच्या कमाईत भर पडेल. मात्र, एखादा मोठा चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच घटना नाही.

शक्तिमान तलावर लिखित 'गदर 2' या सिनेमाची मूळ कथा तारासिंग आणि त्याच्या मुलाभोवती फिरते. सिनेमाच्या पहिल्या भागात कथा अत्यंत संथ गतीने पुढे सरकते. परंतु, दुसऱ्या भागात ही कथा स्पीडमध्ये पुढे गेली आहे. सिनेमाच्या कथानकाला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे.  सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट 'गदर' 2001 साली रिलीज झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'गदर 2' चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. 'गदर 2' चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेल