सनी देओलच्या 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करायला सुरुवात केली होती. २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदरमधील तारा सिंह आणि सकिनाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. २२ वर्षांनंतरही 'गदर २'ने प्रेक्षकांवर तीच जादू केलेली पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता गदर २ आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाधवा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला पार केला. गदर २च्या ओटीटी राइट्समधूनही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. गदर २चे ओटीटी राइट्स झी५ या प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत. ओटीटी राइट्समधून 'गदर २'ने ५० कोटींची कमाई केली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने 'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या दर्शनाला, पाहा फोटो
देव आनंद यांच्या ७३ वर्ष जुन्या बंगल्याची विक्री नाही; कुटुंबीय म्हणाले, "४०० कोटींची डील..."
'गदर २' हा चित्रपट ११ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या ५६ दिवसांनी 'गदर २' झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ६ ऑक्टोबरला 'गदर २' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना 'गदर २'च्या ओटीटी प्रदर्शनासाठी आणखी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.