Join us

Gadar 2 : हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा ! हातात हातोडा घेऊन तारासिंग येतोय, 'गदर २' ची रिलीज डेट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 2:07 PM

२००१ मध्ये आलेला 'गदर' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

Gadar 2 :  २००१ मध्ये आलेला 'गदर' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांनी 'गदर' मध्ये अशी काही अभिनयाची जादू दाखवली आणि हा सिनेमा चांगलाच गाजला. सनी देओलचे अॅक्शन सीन्स असो, दोघांचा रोमान्स असो किंवा मग सिनेमातील गाणी हे सर्व प्रेक्षकांच्या मनात १२ वर्षांनंतर सुद्धा घर करुन आहे. तर आता चाहत्यांसाठी गदरचा सीक्वल लवकरच येतोय. 'गदर २' (Gadar 2) मधील सनी देओलचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झालाय. हातात हतोडा घेऊन तारासिंग पुन्हा लढण्यासाठी सज्ज झालेला दिसतोय.

गदर २ ची उत्सुकता नाही असं कोणी नसेलच. जुनी पिढी असो किंवा नवी पिढी सर्वांनाच सनीा देओल ला गदरच्या सिक्वलमध्ये पाहण्याची उत्सुकता आहे. या नव्या पोस्टरमध्ये सनी देओल चा तसाच आक्रमक अंदाज पाहायला मिळत आगे. गदर १ तारासिंग हॅंडपंप उचलताना दिसला होता. त्याच्या या अॅक्शनची चांगलीच चर्चा झाली होती. आता गदर २ च्या नव्या पोस्टरमध्ये त्याच्या हातात हतोडा आणि चेहऱ्यावर रागाची भावना आहे. देशाकडे आणि त्याच्या कुटुंबाकडे बोट दाखवणाऱ्यांचे तारासिंग काय हाल करतो हे आता गदर २ मध्येही बघायला मिळणार आहे. सनी देओलने सोशल मीडियावर गदर २ चे पोस्टर शेअर करत लिहिले, 'हिंदुस्थान जिंदाबाद है...जिंदाबाद था...और जिंदाबाद रहेगा !येत्या स्वातंत्र्यदिनी दोन दशकांनंतर गदर चा सिक्वल येत आहे.'

चाहत्यांनी गदर २ चा फर्स्ट लुक खूपच पसंत केला आहे. सर्वांनाच आता सिनेमाच्या ट्रेलरची आणि चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची उत्सुकता आहे. तर गदर २ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट रोजी गदर २ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका आहे. तर गदर मधील छोटा मुलगा उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) देखील सिक्वल मध्ये दिसणार आहे. 

गदर २ चे शूट लखनऊमध्ये सुरु आहे. लखनऊच्या मार्टिनियर कॉलेजलाच पाकिस्तान सेनेचे मुख्यालय बनवून तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता.

टॅग्स :सिनेमासनी देओलअमिषा पटेलबॉलिवूड