Join us

Video : "याला म्हणतात संस्कार", 'गदर २'च्या सक्सेस पार्टीत सनीचा लेक पडला शाहरुखच्या पाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 11:19 IST

Gadar 2 : 'गदर २'च्या सक्सेस पार्टीत सनीचा लेक शाहरुखच्या पाया पडला अन्...; व्हिडिओ व्हायरल

सनी देओलच्या 'गदर २'ने महिन्याभराच्या आतच ५०० कोटींची कमाई केली. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 'गदर २'ने रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर या सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 'गदर २'च्या सक्सेस पार्टीतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'गदर २'च्या सक्सेस पार्टीला किंग खाननेही हजेरी लावली होती. तर नुकतंच लग्न झालेलं सनी देओलचा लेक करण देओल त्याची पत्नी दिशासह सहभागी झाला होता. या पार्टीत करण देओल आणि त्याच्या पत्नीने किंग खानच्या पाया पडत त्याचे आशीर्वाद घेतले. 'इन्स्टंट बॉलिवूड' या पापाराझी पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. करण देओल आणि किंग खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

“मी तुझं लग्न लावून देतो”, अमिषा पटेलला असं का म्हणाला संजय दत्त? अभिनेत्रीनेच केला खुलासा 

करण देओल आणि शाहरुख खानचा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये करण देओल किंग खानचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी सनी देओलच्या लेकाचं कौतुक करत आहेत. अनेकांनी "हे आहेत संस्कार" अशी कमेंट केली आहे. 

शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी मोडणार सनी पाजीच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड? कमावणार ‘इतके’ कोटी

दरम्यान, 'गदर २' चित्रपट हा २००१ साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' सिनेमाचा सीक्वल आहे. तब्बल १२ वर्षांनी सीक्वल येऊन देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'गदर'प्रमाणेच हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

टॅग्स :सनी देओलशाहरुख खानअमिषा पटेलबॉलिवूड