Join us

सनी देओलच्या ‘गदर २’ला पंजाबमध्ये बॉयकॉट करण्याची मागणी, समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 6:01 PM

Gadar 2 : 'गदर २'ला पंजाबमध्ये विरोध, नेमकं कारण काय? जाणून घ्या

२००१ साली प्रदर्शित झालेला ‘गदर’ हा सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. भारत-पाकिस्तानमधील दोन प्रेमीयुगुलांची कहाणी या चित्रपटातून दाखविण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल तब्बल २२ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सनी देओलच्या ‘गदर २’साठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. परंतु, पंजाबमध्ये या चित्रपटाला विरोध होत असल्याचं चित्र आहे.

पंजाबमधील गुरदासपूर शहरात सनी देओलच्या ‘गदर २’ला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. यामागील मोठं कारणही समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गुरदासपूरमध्ये ‘गदर २’ला कडाडून विरोध केला जात आहे. सनी देओलने अमृतसरमधील श्री दरबार साहिबला भेट दिली. परंतु, तिथून ३० किमी अंतरावर असलेल्या गुरदासपूरकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या चित्रपटाला विरोध केला जात आहे. गुरदासपूर हा सनी देओलचा मतदारसंघ आहे. त्यामुळेच पंजाबमध्ये येऊन गुरदासपूरला वगळल्याने तेथील नागरिकांकडून संताप व्यक्त करत ‘गदर २’ बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

“दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

तिप्पट टोलवसुलीनंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे ऋजुता देशमुख पुन्हा त्रस्त, म्हणाली, “नाटकाची बस...”

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओल तारा सिंह तर अमीषा पटेल सकीनाच्या भूमिकेत आहे. अभिनेता उत्कर्ष शर्मा या चित्रपटात सनी देओलच्या भूमिकेत आहे. ‘गदर २’ चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाची एक लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे ‘गदर’ प्रमाणेच ‘गदर २’ देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडअमिषा पटेल