Join us

भारतात गाजत असलेला 'गदर 2' परदेशात मात्र फ्लॉप, सनी पाजीची जादू डॉलर्समध्ये पडली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:20 PM

भारतात 'गदर'ने पाचच दिवसात 200 कोटींचा आकडा पार केला आहे.

2001 साली आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' (Gadar) सिनेमाचा सिक्वल २२ वर्षांनंतर रिलीज झाला. पुन्हा एकदा सनी देओल (Sunny Deol) तारासिंगच्या अवतारात दिसला. भारत पाकिस्तान वाद, तारासिंग सकीनाची लव्हस्टोरी हे सगळं पुन्हा थिएटरमध्ये अनुभवायला मिळत आहे. 'गदर २' पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. सध्या 'गदर २' चे शो हाऊसफुल सुरु आहेत. भारतात 'गदर'ने पाचच दिवसात 200 कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र परदेशात सिनेमा फ्लॉप झालाय.

सनी देओलच्या 'गदर 2' ची जादू जितकी भारतात आहे तितकी परदेशात दिसून येत नाही. भारतात 'गदर २' पहिल्याच दिवशी तब्बल 40.10 कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.70 कोटी, चौथ्या दिवशी 38.70 कोटी, पाचव्या दिवशी 55.50 कोटी आणि सहाव्या दिवशी 33.50 कोटी रुपयांची कमाई केली. 'गदर 2' ने देशात आतापर्यंत एकूण 262.48 कोटींचा व्यवसाय केला आहे.

तर दुसरीकडे परदेशातील कमाईचे आकडे काय सांगतात ?

जेव्हा एखादा सिनेमा हिट होतो तेव्हा फक्त भारतातच नाही तर देशाबाहेरही त्याचा बोलबाला असतो. 'पठाण','RRR' वरुन हे लक्षात येतं. मात्र 'गदर 2' बद्दल सांगायचं झालं तर सिनेमा परदेशात चांगलाच आपटला आहे. सनी पाजीची जादू परदेशात फिकी पडली आहे. पहिल्या विकेंडला 'गदर 2'ने 2.168 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच 17.99 कोटी रुपये कमवले. सिनेमाला ५ मिलियन गाठण्यासाठी खूप वेळ लागेल असं दिसतंय. हे वर्ल्ड वाईड रिलीजसाठी धोक्याचं आहे.

याआधी शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाने वर्ल्डवाईड 48.5 मिलियन अमेरिकी डॉलरचा व्यवसाय केला. इतकंच नाही तर नुकत्याच रिलीज झालेल्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाने वर्ल्डवाईड 14 मिलियन अमेरिकी डॉलर कमवले. त्यामुळे 'गदर 2' हे रेकॉर्ड मोडू शकेल की नाही यात शंका आहे,

टॅग्स :सनी देओलबॉलिवूड