बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत ‘गदर २’ या सिनेमा अखेर शुक्रवारी (११ ऑगस्ट) सर्वत्र प्रदर्शित झाला. २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. तब्बल २२ वर्षांनी आलेल्या गदर २बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ‘गदर २’ प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाची तब्बल एक लाखांहून अधिक तिकिटे अडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून विकली गेली होती. पहिल्या दोन दिवसांत या सिनेमा ८० कोटींहून अधिक दमदार कमाई केली होती. त्यामुळे सहाजिकच तिसऱ्या दिवशीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील आपली पकड कायम ठेवली असेलच.
पहिल्याच दिवशी 'गदर 2'ने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले. रिलीजच्य दिसऱ्या दिवशी 43.08 कोटींची कमाई केली आहे.'गदर 2' 2023 मधला दुसरा सिनेमा आहे जो इतक्यात कमीवेळात १०० कोटींच्या जवळपास पोहोचला. कारण दोन दिवसांत 'गदर २'ने 83.18 कोटींचा गल्ला जमावला आहे.
गदर 2 च्या तिसर्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या मते, चित्रपटाने तिसर्या दिवशी 52 कोटींची कमाई केली असून, चित्रपटाचे एकूण कलेक्शन 133 कोटींवर पोहोचले आहे. ही २०२३मधली रेकॉर्डब्रेक कमाई आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ ने पहिल्या वीकेंडला चांगली कमाई केली असून १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशभरातही देशभक्तीचा फिव्हर आहे, तसेच, जोडून सुट्ट्या आल्याने चित्रपटगृह हाऊसफुल्ल होत आहेत.
‘गदर २’ चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनेता उत्कर्ष शर्माने चित्रपटात तारा सिंहच्या मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.