यंदाच्या आठवड्यात प्रेक्षकांना चित्रपटांची मेजवानीच मिळाली आहे. दोन सुपरहिट ठरलेल्या बॉलिवूड सिनेमांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आले. शुक्रवारी (११ ऑगस्ट) बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ या दोन चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या दोन्ही सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ या दोन चित्रपटांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली.
सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गदर’ सिनेमाने २००१ साली बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तब्बल २२ वर्षांनंतर त्याचा सीक्वेल ‘गदर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची तब्बल १ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली होती. तर २०१२ साली प्रदर्शित झालेला ‘ओएमजी’ (OMG) हा सिनेमादेखील प्रेक्षकांना भावला होता. ११ वर्षांनंतर सेक्स एज्युकेशनसारख्या विषयावर या चित्रपटातून भाष्य करत ‘ओएमजी २’(OMG 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे या दोनही सिनेमांसाठी प्रेक्षक आतुर होते. आता या दोन्ही सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
"विचारधारा जुळत नसली तरी पक्ष फोडून सत्तेत...", राजकारणावर वैभव मांगले स्पष्टच बोलले
Gadar 2 : सनी देओलच्या ‘गदर २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून भाईजान थक्क, म्हणाला, “ढाई किलो का हाथ...”
सनी देओलचा ‘गदर २’ पहिल्याच दिवशी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’(OMG 2) वर भारी पडला आहे. ‘गदर २’ ने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल ४० कोटींची कमाई केली आहे. तर ‘ओएमजी २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत ‘गदर २’ सिनेमा ‘ओएमजी २’(OMG 2) पेक्षा वरचढ ठरला आहे. आता या दोन्ही सिनेमांच्या पहिल्या वीकेण्ड कलेक्शनकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.