सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2'चा (Gadar 2) धुमाकूळ सुरुच आहे. २६ व्या दिवशीही सिनेमाने चांगली कमाई केली आहे. ११ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सिनेमाने बॉक्सऑफिसवर गदर माजवला आहे. २५ दिवसातच 'गदर' ने ५०० कोटींचा गल्ला पार केला आहे. २६ व्या दिवशीही सिनेमाने ३.५० कोटींची कमाई करत इतिहासच रचला आहे.
'गदर 2' ने रिलीजच्या पहिल्या तीन आठवड्यांत चित्रपटाने ज्या वेगाने कमाई केली, त्यामुळे चौथ्या वीकेंडपूर्वीच हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, असा अंदाज बांधला जात होता. सिनेमाने पहिल्या आठवड्यात 284.63 कोटींची कमाई केली, दुसऱ्या आठवड्यात १३४.४७ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात ६३.३५ कोटी कमावले. चौथ्या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या शनिवारी 493.37 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारच्या कलेक्शनच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, चित्रपटाने जवळपास 8.50 कोटी रुपयांच्या कमाईसह 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
'गदर 2' च्या यशानिमित्त सनीने ग्रँड पार्टीही दिली. या पार्टीत संपूर्ण बॉलिूवड एकत्र आलं. अगदी किंग खानही पार्टीत सहभागी झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ३० वर्षांचे मतभेद विसरुन दोघांनी गळाभेट घेतली. सनी देओलची क्रेझ परत आल्याचं चित्र आहे.