खेळ शंभर कोटींचा; या चित्रपटांनी तीनच दिवसात गाठली शंभरी, वाचा संपूर्ण लिस्ट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 8:54 AM
हल्ली बॉलिवूडमधील प्रत्येक निर्माता शंभर कोटींचा आकडा डोळ्यासमोर ठेवून चित्रपटाची निर्मिती करतो. कारण शंभर कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणे म्हणजेच ...
हल्ली बॉलिवूडमधील प्रत्येक निर्माता शंभर कोटींचा आकडा डोळ्यासमोर ठेवून चित्रपटाची निर्मिती करतो. कारण शंभर कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणे म्हणजेच सुपरहिटच्या कॅटेगिरीत स्थान मिळविणे, हे सूत्रच झाल्याने जो-तो शंभर कोटींचा क्लब डोळ्यासमोर ठेवत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांचा विचार केल्यास ‘बाहुबली-२’ आणि त्यानंतर प्रदर्शित झालेल्या डझनभर चित्रपटांपैकी एक-दोन चित्रपट सोडल्यास एकाही चित्रपटाला या क्लबमध्ये स्थान मिळविता आले नाही. विशेष म्हणजे ज्यांच्या नावाने शंभर कोटी अगोदरच निश्चित व्हायचे त्या सुपरस्टारलाही हा जादूई आकडा गाठताना दम लागत आहे. मात्र एक काळ असा होता की, तीन दिवसांमध्येच हा आकडा गाठला जायचा. असे कोणते चित्रपट आहे ज्यांनी हा करिष्मा केला? त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत... बाहुबली-२ सध्या किंवा पुढच्या काही काळापर्यंत कुठलाही बॉक्स आॅफिस रिपोर्ट बनवायचा झाल्यास, त्यावर अग्रस्थानी ‘बाहुबली-२’चे नाव राहील, यात कुठलीही शंका नाही. या चित्रपटाने ज्या पद्धतीने यशाची चव चाखली, त्यावरून सध्याची स्थिती पाहता ही चव दुसºया कोण्या सुपरस्टारला सहजासहजी चाखता येणार नाही, असेच काहीसे चित्र आहे. चित्रपटाची निर्मिती जरी साउथमध्ये केली असली तरी, हिंदी व्हर्जनने प्रेक्षकांना मोहिनी घातली. त्याचीच प्रचिती म्हणून चित्रपटाने केवळ तीनच दिवसांत शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. हिंदी व्हर्जनमध्ये या चित्रपटाने ५१०.९८ कोटींची कमाई केली. दंगलगेल्या वर्षीच्या ख्रिसमसनिमित्त रिलीज झालेल्या आमीर खानच्या ‘दंगल’नेही बॉक्स आॅफिसवर झटपट कमाई केली. या चित्रपटाने तीनच दिवसांत शंभर कोटींचा आकडा गाठला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ३८७.३८ कोटी इतकी कमाई केली. बजरंगी भाईजानसलमान खानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे ‘बजरंगी भाईजान’ हा आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत शंभर कोटींची कमाई केलीच, शिवाय बॉक्स आॅफिसवर ३२०.४५ कोटींचा ताबडतोब गल्लाही जमविला. चित्रपटात एक चिमुकल्या मुन्नी नावाच्या मुलीची आणि सलमानची चांगलीच केमिस्ट्री जमली. सुलतान सलमान आणि अनुष्का शर्माच्या ‘सुलतान’नेही प्रेक्षकांची मने जिंकली. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ३००.४५ कोटी रुपयांची कमाई केली. तसेच पहिल्या तीन दिवसांतच शंभर कोटींचा गल्लाही जमविला. चित्रपटासाठी सलमानने प्रचंड मेहनत घेतली. धूम ३ धूम सीरिजच्या तिसºया भागात म्हणजेच ‘धूम-३’मध्ये मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान याने एका चोराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि उदय चोपडा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाने तीन दिवसांतच शंभर कोटींची कमाई केली होती तर बॉक्स आॅफिसवरील सर्व कलेक्शन २८४.२७ कोटी इतके होते. प्रेम रतन धन पायोसलमान खान आणि सोनम कपूर स्टारर संस्कारी फिल्म ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटानेही प्रेक्षकांची मने जिंकली. डबल रोलमध्ये असलेला सलमान बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविणार नाही, असेच काहीसे चित्र होते. समीक्षकांनीही चित्रपटाला फारसे सकारात्मक स्टार दिले नव्हते. अशातही या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर २०८.८८ कोटींची कमाई केली. हॅप्पी न्यू ईयर शाहरूख खानचा हॅप्पी न्यू ईयर हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटाने त्याच्या रिलीज अगोदरच बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड बनविण्यास सुरुवात केली होती. परंतु समीक्षकांनी चित्रपटाबद्दल फारसे सकारात्मक मत व्यक्त केले नव्हते. अशातही चित्रपटाने तीन दिवसात शंभर कोटींची कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर २०३ कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता.