येत्या ३० जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर ‘द गांधी मर्डर’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण भारतात नाही तर भारताबाहेर. होय, महात्मा गांधी याच्या जीवनावर आधारित ‘द गांधी मर्डर’ या चित्रपटाचे भारतातील प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्याला शारिरीक इजा पोहोचवण्याची धमकी देण्यात आल्यामुळे हा सिनेमा आता भारतात प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाच्या निर्मात्या लक्ष्मी आर अय्यर यांनी याबद्दल माहिती दिली. आयएएनएसशी बोलताना त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही ‘द गांधी मर्डर’ भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत एक खूप मोठी बाजारपेठ आहे, इथे विविध प्रकारचे लोक राहतात. पण दुर्दैवाने काही तत्त्वांनी मला व दिग्दर्शकांना धमकी दिली आहे. शारिरीक इजा पोहोचवण्याचे या तत्त्वांनी म्हटले आहे, असे त्यांनी सांगितले.
‘द गांधी मर्डर’च्या निर्माता-दिग्दर्शकाला धमकीचे फोन, भारतातील प्रदर्शन रद्द!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 10:02 IST
होय, महात्मा गांधी याच्या जीवनावर आधारित ‘द गांधी मर्डर’ या चित्रपटाचे भारतातील प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.
‘द गांधी मर्डर’च्या निर्माता-दिग्दर्शकाला धमकीचे फोन, भारतातील प्रदर्शन रद्द!!
ठळक मुद्दे ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाली होती. या हत्येमागच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेला आहे.