Join us

सुखकर्ता दुःखहर्ता... 'भाईजान'नं बच्चेकंपनीसह केली गणेशाची आरती, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 15:15 IST

अर्पिता खानच्या घरी सलमानने केलेल्या आरतीचा एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे.

Salman Khan Ganesh Chaturthi Celebration : गणरायांच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मनोरंजन विश्वातही सेलिब्रिटींनी वाजत गाजत गणपती बाप्पाचं (Ganeshotsav 2024) स्वागत केलं आहे. यंदा बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. 

अर्पिता खानच्या घरी सलमानने केलेल्या आरतीचा एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान हा लहान मुलांसोबत आरती करताना दिसून येत आहे. यावेळी अरबाज खान, सोहेल खान, सलमानचे वडील सलीम खान यांच्यासह सलमान खानचं संपुर्ण कुटुंब उपस्थित असल्याचं दिसून येत आहे.  याशिवाय, अभिनेता वरुण शर्मा, ऑरी सुद्धा सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय.

सलमान खान हा ईद, गणेश उत्सव ते दिवाळी हे सर्व सण मोठ्या जल्लोषात साजरे करतो. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'सिकंदर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो रश्मिका मंदानासोबत स्क्रिन शेअर करेल.  ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे.  तसेच अजय देवगणच्या  'सिंघम अगेन'मध्येदेखील सलमानचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे, पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :सलमान खानगणेशोत्सव 2024सेलिब्रिटी गणेशबॉलिवूड