कालपरवाच आलिया भटच्या (Alia Bhat) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. आलियाच्या भूमिकेचं जबरदस्त कौतुक होतंय. आलियाने यात मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अजय देवगणही (Ajay Devgan) आहे. त्याने यात गँगस्टर करीमलालाचं पात्र जिवंत केलं आहे. साहजिकच हा सिनेमा पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
खरं तर आलियाच्या या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. गंगूबाईची भूमिका साकारण्यासाठी आलियाने प्रचंड मेहनत घेतली. अगदी मुंबईतला रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठीपुऱ्यातील सेक्स वर्कर्ससोबतही तिनं वेळ घालवला. आता या सिनेमासाठी तिनं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे.
रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी आलियाने अजय देवगणपेक्षाही जास्त मानधन घेतलं. होय, भन्साळींच्या या सिनेमासाठी तिने 20 कोटी रूपये फी घेतली. अजय देवगणची सिनेमात फार मोठी भूमिका नाही. त्याने त्याच्या रोलसाठी 11 कोटी मानधन घेतलं.
अभिनेता विजय राजने या चित्रपटात रझियाबाईची भूमिका साकारली आहे. हे स्त्री पात्र साकारण्यासाठी त्याने 1.5 कोटी रूपये घेतल्याचं कळतं.
अभिनेत्री सीमा पाहवा यांनीही ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी 20 लाख रूपये मानधन घेतल्याचं कळतं.
भन्साळींच्या या सिनेमात टीव्हीचा एक लोकप्रिय चेहराही दिसणार आहे. शंतनू माहेश्वरी या चित्रपटाच्या निमित्तानं बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. त्याने या सिनेमासाठी 50 लाख रूपये फी घेतल्याची चर्चा आहे.
कोण होती गंगूबाई काठियावाडी?
संजय लीला भन्साळी यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट या महिन्यात 25 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, करीम लाला गंगूबाईला आपली बहीण मानतो आणि तिला साथ देतो. गंगूबाई गुजरातमधील काठियावाड येथील रहिवासी होत्या त्यामुळे तिला गंगूबाई काठियावाडी असे म्हटले जात होते आणि तिला तिच्या पतीने 500 रुपयांना विकले होते. गंगूबाई गुजरातमधील कठियावाड येथील राहणारी होती. यामुळेच तिला गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखलं जाऊ लागलं. कमी वयातच गंगूबाईला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलं होतं. गंगूबाईचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. तिला अभिनेत्री व्हायचं होतं. पण वयाच्या 16 व्या वर्षी तिला वडिलांच्या अकाउंटन्टशी प्रेम झालं आणि लग्न करून ती मुंबईत पळून आली. पण तिच्या नवऱ्यानेच तिला फक्त ५०० रुपयांसाठी कोठ्यावर विकलं.