Join us  

Gunaah OTT Release : गश्मीर आणि सुरभीचा जबरदस्त अभिनय; "गुनाह"चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:31 AM

'गुनाह' या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

 हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा गश्मीर महाजनी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. गश्मीर यांच्या चाहत्यांची संध्या देखील फार मोठी आहे.  गश्मीर महाजनी याने स्वतःला फक्त मराठी इंडस्ड्रीपर्यंत मर्यादित न ठेवता बॉलिवूडमध्ये देखील अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. लवरकच तो 'गुनाह' या क्राईम थ्रिलर सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

अभिनेत्री सुरभी ज्योती, झेन इबाद खान आणि गश्मीर महाजनी स्टारर 'गुनाह' ही एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे, जी सस्पेन्सने परिपुर्ण आहे. गश्मीर महाजनी पहिल्यांदाच अँटी हिरो बनून ओटीटीच्या जगात खळबळ माजवणार आहे. या सीरिजमध्ये गश्मीर अभिमन्यूची भूमिका साकारत आहे. तर झैन इबाद देखील अभिमन्यूची भूमिका करतोय, जो प्लास्टिक सर्जरीनंतर गश्मीरचा चेहरा घेऊन बदला घेण्यासाठी परततो. ही सीरिज येत्या 3 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

दरम्यान गश्मीर महाजनी हा 'खतरों के खिलाडी १४'मध्ये सहभागी झाला आहे.  इतर स्पर्धकांसोबत 'खतरों के खिलाडी १४'साठी गश्मीर रोमानियाला गेला आहे. गश्मीरला 'खतरों के खिलाडी' मध्ये स्टंट करताना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. गश्मीरने आतापर्यंत ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘विशू’, ‘डोंगरी का राजा’ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय तो हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे.   

टॅग्स :गश्मिर महाजनीसेलिब्रिटी