‘पाकिस्तानी’ म्हणणाऱ्या चाहत्याला गौहर खानने फटकारले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2017 2:26 PM
‘बिग बॉस’ या सर्वाधिक वादग्रस्त शोच्या सातव्या सीजनची विजेती अभिनेत्री गौहर खान सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. त्याचे झाले असे की, गौहरने नेहमीप्रमाणेच तिचा फोटो सोशल अकाउंटवर शेअर केला.
‘बिग बॉस’ या सर्वाधिक वादग्रस्त शोच्या सातव्या सीजनची विजेती अभिनेत्री गौहर खान सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. त्याचे झाले असे की, गौहरने नेहमीप्रमाणेच तिचा फोटो सोशल अकाउंटवर शेअर केला. तिच्या या फोटोला चाहत्यांनी प्रचंड लाइक्स केले. तसेच कॉमेण्टच्या स्वरूपात तिचे कौतुकही केले. मात्र एका चाहत्याने तिच्या फोटोला असे काही कॉमेण्ट दिले ज्यामुळे तिच्या रागाला पारावार उरला नाही. तिने लगेचच त्या चाहत्याला खडेबोल सुनावले. फॅशनसह अभिनय क्षेत्रात स्वत:च्या हिम्मतीवर नाव कमाविणारी गौहर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. शिवाय ती नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर स्पष्ट शब्दात बोलणे पसंत करते. त्यामुळेच तिच्या फोटोला मिळालेल्या या खोचक कॉमेण्टचा तिने लागलीच समाचार घेतल्याने ती चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, गौहरने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक फोटो शेअर केला. फोटोत ती काळ्या रंगाचे जॅकेट, पांढºया रंगाचा क्रॉफ टॉप आणि निळ्या रंगाची डेनिमवर दिसत आहे. फोटोमध्ये गौहर खूपच सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिने फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र एका चाहत्याने कॉमेण्टमध्ये तिला ‘पाकिस्तानी’ असे म्हटले. त्यामुळे गौहरचा चांगलाच संताप झाला. या चाहत्याने म्हटले की, ‘चॅम्पियंस ट्राफीमध्ये तुझ्या टीमला पराभव पत्करावा लागला.’ या कॉमेण्टला गौहरने जशास तसे उत्तर दिले. तिने म्हटले की, ‘भारतच माझा देश आहे. मला असे वाटते की, तू दुसºया ग्रहातून आला असावा. मला सर्व देशांप्रती प्रेम आहे. तसेच मी सर्व धर्मांचा सन्मान करते. मात्र तुझे विचार खूपच तोडके आहेत. त्यामुळे तू हे समजू शकणार नाहीस. मी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करेल.’असो, गौहरने दिलेल्या उत्तरानंतर त्या चाहत्यांची चांगलीच त्रेधातिरपट झाली असावी यात शंका नाही. गौहरच्या या उत्तराचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. नेटिझन्सकडूनही तिला यासाठी सपोर्ट केला जात आहे. गौहर नुकतेच विद्या बालन फेम ‘बेगमजान’ या चित्रपटात झळकली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही झाले होते.