कुशालनंतर गौहर खान पडली कुणाच्या प्रेमात?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 3:56 PM
new man in gauhar khans life, gauhar khan : गौहर खान च्या आयुष्यात एका नव्या हँडसम बॉयची एन्ट्री झालीय. या हँडसम बॉयचे नाव आहे, रूपिन पाहवा.
बॉलिवूडची आयटम गर्ल गौहर खान आणि कुशाल टंडन यांचे ‘बिग बॉस’मध्ये बहरलेले प्रेम कधीचेच संपलेय. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतरही गौहर बराच काळ कुशालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे नाते फार काळ चालले नाही. आता गौहर पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची खबर आहे. होय, गौहरच्या आयुष्यात एका नव्या हँडसम बॉयची एन्ट्री झालीय. या हँडसम बॉयचे नाव आहे, रूपिन पाहवा. दिल्लीला राहणारा रूपिन व गौहर गेल्या तीन महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जातेय. मुंबई एका इव्हेंटमध्ये रूपिन व गौहरची नजरानजर झाली होती. मग दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रूपिनबद्दल आणखी माहिती द्यायची झाल्यास, सन २०१३ मध्ये फिनलँड येथे झालेल्या ‘कराओके वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या गौहर आणि रूपिनच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. अलीकडे मुंबईत झालेल्या ‘कोल्ड प्ले कॉन्सर्ट’मध्ये गौहर आणि रूपिन यांची चांगलीच जवळीक दिसली होती. नुकतीच गौहर मुंबईतील तिच्या पेंटहाऊसमध्ये शिफ्ट झाली. गत सोमवारी यानिमित्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसाठी तिने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत गौहरचा लव्हर बॉय रूपिनही हजर होता. ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमध्ये गौहर आणि कुशाल यांचे सूत जुळले होते. दोघांच्याही चाहत्यांनी या जोडीला ‘गौशाल’ हे नाव दिले होते. गौहर या सीझनची विजेती ठरली होती. ‘बिग बॉस’च्या घराबाहेरही गौहर व कुशालचे प्रेम काही काळ कायम होते. मात्र आक्टोबर २०१४ मध्ये अचानक या दोघांच्या ब्रेकअपची बातमी आहे. स्वत: कुशालने सोशल मीडियावर याची घोषणा केली होती. मित्रांनो आता गौशाल सारखे काहीही नाही. गौहर व मी आमच्यात आता काहीही नाही, असे कुशालने लिहिले होते. यानंतर अभिनेता हर्षवर्धन राणे याच्यासोबत गौहर रिलेशनशिपमध्ये असल्याची खबर आली. हर्षवर्धनमुुळेच गौहर व कुशालचे बिनसले, इतकेही बोलले गेले. अर्थात अगदी अलीकडे मी गौहरला डेट करत नसल्याचा खुलासा हर्षवर्धनने केला होता.७\\