बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याची पत्नी गौरी खान (gauri khan) केवळ एक सेलिब्रिटी वाइफ नसून प्रसिद्ध उद्योजिकादेखील आहे. गौरीने तिच्या स्वबळावर कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. एक प्रसिद्ध इंटेरिअर डेकोरेटर असण्यासोबतच ती एका वेळी अनेक कंपन्याही सांभाळते. त्यामुळेच किंग खानच्या पत्नीची एकटीची कमाई किती ते जाणून घेऊयात.
गौरी खान कमाईच्या बाबतीत दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींना सुद्धा मागे टाकते. मुळची दिल्लीची असलेल्या गौरीने इतिहास या विषयात ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यानंतर तिने NIFT मधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. १९९१ मध्ये शाहरुखशी लग्न करणारी गौरी आज १६०० कोटी रुपये संपत्तीची मालकीण असल्याचं म्हटलं जातं.
यशस्वी निर्माती आहे गौरी खान
२००२ साली गौरीने रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. या कंपनीत शाहरुख सुद्धा पार्टनर आहे. या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत तिने मैं हूँ नासह तब्बल २०सिनेमांची निर्मिती केली. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून ती वर्षाला ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई करते.
डिजाइनर आहे गौरी
गौरी एक प्रसिद्ध आणि अनुभवी इंटेरिअर डिझायनरही आहे. मुंबईतील जुहू येथे तिचं गौरी खान डिझाइन्स हे शोरुम आहे. या स्टुडिओची किंमत जवळपास १५० कोटी रुपये इतकी आहे. आतापर्यंत गौरीने मुकेश आंबानी, नीता आंबानी, रॉबर्टो कॅवल्ली, राल्फ लॉरेन आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची घरं डिझाइन केली आहेत.
२०० कोटींच्या बंगल्याची आहे मालकीण
गौरीने तिचा मन्नत हा बंगला स्वत: डिझाइन केला आहे. या घराची किंमत २०० कोटी रुपये आहे.
मुंबईत आहे रेस्टॉरंट
गौरीचं मुंबईमध्ये अर्थ नावाचं एक रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटची किंमत १६०० कोटी रुपये इतकी आहे.
विदेशात आहे प्रॉपर्टी
एका प्रसिद्ध डेव्हलपरने गौरी आणि शाहरुखला दुबईमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. पाम जुमेराह येथे ७ हजार वर्ग फूटमध्ये जागेत असलेल्या या प्रॉपर्टीची किंमत २४ कोटी रुपये इतकी आहे. तसंच अलिबागमध्येही तिचं १५ कोटींचं हॉलिडे होम आणि लॉस एंजिल्समध्ये हवेली आहे. तसं लंडनमध्येही तिचं घर आहे. दरम्यान, गौरीकडे २.५ कोटींची एक स्पोर्ट्स कार आहे. तसंच तिच्याकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी कार आहे.