बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) घरातील वातावरण सध्या फारच निराशाजनक आहे. लीगल एक्सपर्ट्स आणि जवळच्या मित्रांसोबत शाहरूख आणि गौरी (Gauri Khan) सतत संपर्कात आहेत. आर्यन खानला ड्रग्स (Aryan Khan drugs case) केस प्रकरणात क्रूझवर पार्टीतून अटक झाली होती. आर्यनकडे ड्रग्स सापडलं नाही, पण त्याचं इंटरनॅशनल कनेक्शन सांगितलं जात आहे.
आर्यन खानला जामीन मिळणं अवघड झालं आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आणि आर्यन खानचे वकिल यांच्यात मोठा वाद-विवाद चालला. १४ ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर कोर्टाने सुनावणी २० ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली. याचं कारण काही दिवसांची सतत आलेली सुट्टी. कोर्टाच्या या सेशन्सच्या मधे शाहरूख खान आणि गौरी खानच्या मित्रांनी सांगितलं की, दोघेही प्रत्येक जाणाऱ्या दिवसानुसार अधिक चिंतेत आहेत.
मित्रांनी सांगितलं की, गौरी खानने मुलगा आर्यनसाठी प्रार्थना केली आहे. त्यासोबत नवरात्री दरम्यान ती सतत प्रार्थना करत आहे. इतकंच काय तर उत्सवाची सुरूवात झाल्यापासून तिने गोडही खाल्लं नाही. शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीने इन्स्टाग्रामवर दुर्गा मातेचा फोटो शेअर केला आहे. हा तिने १४ ऑक्टोबरआधी शेअर केला होता. त्यासोबत तिने लिहिले होते की, 'धन्यवाद देवी आई'.
यावेळी शाहरूख खान आणि गौरी खान यांना वाटलं होतं की, आर्यन खानला जामीन मिळेलच आणि तो दुसऱ्या दिवशी बाहेर येईल. पण असं झालं नाही. दोघांच्या हाती निराशा लागली. त्यासोबतच मित्रांनी सांगितलं की, शाहरूख खानने आपल्या सेलिब्रिटी मित्रांना सांगितलं की, त्यांनी मन्नतवर सतत येऊ नये.