गौरी शिंदे झालीय समीक्षकांच्या वैयक्तिक टीकेमुळे निराश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 4:53 PM
‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटाचे कथानक चांगले असतानाही यासाठी अभिनेत्यांना पुरस्कार मिळाला नसल्याने मला दु:ख झाले होते. मात्र यापेक्षाही जास्त दु:ख ...
‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटाचे कथानक चांगले असतानाही यासाठी अभिनेत्यांना पुरस्कार मिळाला नसल्याने मला दु:ख झाले होते. मात्र यापेक्षाही जास्त दु:ख समीक्षकांनी व टीकारांनी केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे झाले असे ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे हिने सांगितले. गौरी म्हणाली, मी टीका एैकण्यास तयार आहे. पण जेव्हा समीक्षक आपली सीमा सोडून बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मला वाईट वाटते. लोकांवर वैयक्तिक टीका करू नयेत. समीक्षकांनी व्यवसायिक रुपात टीका करायला हवी. आपल्या आगामी चित्रपटाबद्दल गौरी म्हणाली, डिअर जिंदगीमध्ये आलिया भट्ट एका महत्त्वकांक्षी भूमिकेत आहे. तिच्या जीवनातील कोड्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. आलिया व शाहरुखसह या चित्रपटात कुणाल कपूर, अली जफर, अंगद बेदी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मागील चित्रपटात श्रीदेवीने चांगली भूमिका साकारूनही तिला पुरस्कार मिळाला नसल्याच्या गोष्टी मला चांगलीच बोचली आहे असे ती म्हणाली. ‘डिअर जिंदगी’ हा गौरीचा दुसरा चित्रपट असून यापूर्वी तिने श्रीदेवी हिची प्रमुख भूमिका असलेला इंग्लिश-विंग्लिश या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातून दीर्घ कलावधीनंतर श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात श्रीदेवीच्या अभिनयाची प्रशंसा देखील झाली होती. याचित्रपटासाठी गौरीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र सरस अभिनय केल्यावरही श्रीदेवीला पुरस्कार मिळाला नसल्याने तिची फार निराशा झाली होती. यातच समीक्षकांनी तिच्यावर टीका केली होती. यामुळे आपल्याला खूप दु:ख झाले असे मत गौरीने सांगितले आहे. दिग्दर्शिका गौरी शिंदे आपल्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत आहे.