अनन्या पांडे (Ananya Panday) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून व्हायरल होत होत्या. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही. त्याचवेळी दोघांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी तीन वर्षांचे नाते संपवले आहे.
अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांनी पहिल्यांदाच 'खाली पीली'मध्ये एकत्र काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले होते. त्याचवेळी नवीन वर्षही एकत्र साजरे केल्याचे सांगण्यात आले, त्यासाठी दोघेही मालदीवला गेले होते. मात्र आता दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.