Join us

बर्लिन फिल्म फेस्टिवलच्या निर्णयाचे आयुष्यमान खुराणाने केले स्वागत !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 6:36 PM

भारतातील सर्व पुरस्कार सोहळ्यांनीही असे बदल घडवणे गरजेचे आहे. हा बदल आपल्याकडेही व्हावा असे आवाहनच आयुषमान खुराणाने केले आहे.

पुरस्कार सोहळे हे एक मोठं आकर्षण असतं.मात्र गेल्या काही वर्षापासून पुरस्कार सोहळ्यांचे महत्त्व आता दिवसेंदिवस कमी होत आहे. यात आता काही निवडकच पुरस्कार सोहळे आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरतात. त्यापैकीच एका सा-यांसाठी उत्सुकतेचा ठरणारा बर्लिन फिल्म फेस्टीव्हलने मोठा बदल केला आहे. पुरस्कार दिले जाणा-यांमध्ये सर्वात्कृष्ठ कलाकार आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री या कॅटगिरीत दिले जाणारे पुरस्कार आता रद्द करण्यात आले आहेत. यापुढे अशी कॅटगिरीत पुरस्कार दिले जाणार नाहीत. अभिनेता असो किंवा अभिनेत्री दोघांमध्ये लिंग भेद नाहीसा होणार आहे. प्रमुख व्यक्तिरेखेतील सर्वोत्कृष्ट अभिनय, सहाय्यक व्यक्तिरेखेतील सर्वोत्कृष्ट अभिनय असे पुरस्कार दिले जातील. भारतातील लिंगाधारित भेदभाव नष्ट व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील असलेला आयुषमान खुराणाने आनंद व्यक्त केला आहे. 

“बर्लिन फिल्म फेस्टिवलच्या लिंगभेद नाहीसा केलेले पुरस्कार देण्यात येण्याच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो आणि जगभरातील तसेच भारतातील अन्य चित्रपट महोत्सवही याचे अनुकरण करतील अशी आशा व्यक्त करतो.  शेवटी आम्ही सगळेच फक्त अभिनेते असतो आणि त्याला कोणतेही लिंग नसते. कलाकार हा कलाकारच असला पाहिजे. लिंगभेद करून आपण त्याची विभागणी करतो.

भारतातील सर्व पुरस्कार सोहळ्यांनीही असे बदल घडवणे गरजेचे आहे. हा बदल आपल्याकडेही व्हावा असे आवाहनच आयुषमानने केले आहे. “भारतातील सगळे पुरस्कार सोहळे योग्य दिशेने पाऊल उचलतील आणि अधिक प्रगतिशील समाजाच्या निर्मितीसाठी जे अत्यावश्यक आहे ते करतील, अशी मला मनापासून आशा आहे. माझ्यासाठी चांगला अभिनय हा फक्त चांगला अभिनय असतो आणि त्याच्याकडे लिंगभेदाच्या चष्म्यातून पाहणे अयोग्य असल्याचे त्याने म्हटले आहे.”

  

टॅग्स :आयुषमान खुराणा