देशभरात काल सोमवारी (२२ जानेवारी) राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी आयोध्येत पोहचले होते. सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेकांनी पोस्ट शेअर केल्या. महाराष्ट्राची लाडकी वहिणी अर्थात अभिनेत्री जेनेलिया देशमुखनंही खास पोस्ट शेअर केली.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात रितेश आणि जिनिलिया देशमुख उपस्थित राहिले नाही. पण, जेनेलियानं ट्विटरवर राम मंदिराचे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, 'आजचा दिवस (२२ जानेवरी) खऱ्या अर्थाने ऐतिहासिक राहिला आहे. जगभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अयोध्येत रामलल्लाच्या आगमन होत असताना अब्जावधी मंत्रोच्चारांमध्ये एक आवाज राहिल्याचा मला अभिमान आहे. आपण सर्वांनी जयश्रीरामचा जयघोष करुया. #जयश्रीराम!!! #राममंदिरप्राणप्रतिष्ठा'. या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
प्रभू श्री रामाची प्राण प्रतिष्ठा पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर विधीवत मंत्रोच्चाराच्या घोषात झाली आहे. अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आहेत. अयोध्येतील ८ एकर जमिनीत हे राम मंदिर उभारलं आहे. या मंदिराचे बांधकाम यावर्षअखेर संपणार आहे. तरीही श्री रामलल्लाचे दर्शन सर्वसामान्यांना काही नियम पाळून घेता येणार आहे. अयोध्येतील राम भक्तांना रामलल्लाच्या दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान, जेनेलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील प्रत्येक घटना, किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या व्हिडीओ वा फोटोच्या माध्यमातून त्यांच्या घरात साजरे केले जाणारे सण, उत्सव यांची झलक दाखवत असते. विशेष म्हणजे जेनेलिया आणि रितेश यांनी त्यांच्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळे नेटकरी सुद्धा त्यांच्या मुलांचं कौतुक करताना दिसतात.