Join us

डीप नेक अन् बॅकलेस गाऊन झेपेना ! सिड-कियाराच्या रिसेप्शनला जिनिलिया वहिनी ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 15:59 IST

रिसेप्शन मध्ये आलेल्या सर्वच अभिनेत्रींच्या लुकची चांगलीच चर्चा रंगली. यावेळी महाराष्ट्राच्या जिनिलिया वहिनी मात्र ट्रोल झाल्या आहेत.

बॉलिवूडचे न्यूलीवेड कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचे रिसेप्शन नुकतेच मुंबईत पार पडले. सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. अनेक बॉलिवूड तारेतारकांनी या रिसेप्शन सोहळ्यासाठी हजेरी लावली. रिसेप्शन मध्ये आलेल्या सर्वच अभिनेत्रींच्या लुकची चांगलीच चर्चा रंगली. यावेळी महाराष्ट्राच्या जिनिलिया वहिनी मात्र ट्रोल झाल्या आहेत.

सिड कियाराच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी खास तयारी करण्यात आली होती. सुरुवातीलाच फोटोग्राफर्सना जागा देण्यात आली होती. फुलांच्या सजावटीत मधोमध SK असे लिहिण्यात आले होते. यासमोरच सर्व सेलिब्रिटी माध्यमांना पोज देत होते. दरम्यान अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia) वहिनीची एंट्री झाली. यावेळी जिनिलियाचा लुक बोल्ड दिसत होता. शिवाय ती आऊटफिटमध्ये कंफर्टेबलही वाटत नव्हती. जिनिलियाने ब्लॅक रंगाचा डीप नेक आणि बॅकलेस गाऊन घातला होता. तर हाय हील्स होती. यामध्ये जिनिलियाला चालणंही अवघड झालं होतं. ती कंफर्टेंबल नाही हे स्पष्ट कळत होतं.

Ved Marathi Movie: 'पठाण' आला नि गेला, पण 'वेड'ची जादू अद्यापही कायम; ४५ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई

रितेशने जिनिलियाचा हात सोडला नाही. तो तिचा हात पकडूनच चालत होता. त्यामुळे जिनिलियाची फजिती तरी झाली नाही. या आऊटफिटवर जिनिलियाने केलेली हेअरस्टाईलही नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली नाही. या हेअरस्टाईलने पूर्ण लुकच खराब केला अशी कमेंट युझर्सने केली आहे. 

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुखट्रोलसोशल मीडिया