Join us

रितेश देशमुखची डोकेदुखी अन् जेनेलियाचा प्रश्न...! व्हिडीओ पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 16:17 IST

Video : रितेश व जेनेलियाचा हा फनी व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

ठळक मुद्देहिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश  आणि जेनेलिया  या जोडीकडे पाहिले जाते.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) सोशल मीडियाचा प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. पर्सनल, प्रोफेशनल लाईफच्या अपडेट्ससोबतच तो आपल्या चाहत्यांसाठी फनी रिल्स शेअर करतो. त्याच्या प्रत्येक फनी रीलवर चाहते भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करतात. आता रितेशने असाच एक मजेदार व्हिडीओ शेअर केलाये. तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.या व्हिडीओत रितेशसोबत त्याची पत्नी जेनेलिया डिसूजाही (Genelia D'Souza) दिसतेय. व्हिडीओत रितेश डोकं पकडून बसलाय. नवरोबा असा डोकं पकडून बसलेला पाहून जेनेलिया काय झालं? असे त्याला विचारते.  डोकं दुखतंय, असे रितेश म्हणतो. यावर कुठे? असा प्रश्न जेनेलिया करते. आता कुठे म्हटल्यावर बिचारा रितेश काय उत्तर देणार? तो अगदी निरूत्तर होतो.

निरूत्तर झालेला रितेश हैराण होऊन कॅमे-याकडे बघतो आणि बॅकग्राऊंडमध्ये ‘भगवान है कहां रे तू...,’ हे गाणं वाजायला लागतं. (Ritesh Deshmukh - Genelia D'Souza funny Video)रितेश व जेनेलियाचा हा फनी व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. आत्तापर्यंत या व्हिडीओला सुमारे 5 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. इनबॉक्समधील कमेंट्स तर विचारू नका. चाहत्यांनी या व्हिडीओवर अगदी हसून हसून पोट दुखेल अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

 हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश  आणि जेनेलिया  या जोडीकडे पाहिले जाते. तुझे मेरी कसम या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.
टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा