Join us  

रितेशकडून 'ही' गोष्ट सर्वांनी शिकावी, जिनिलियानं केलं आपल्या लाडक्या नवऱ्याचं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 5:24 PM

बॉलिवूडमध्ये काम करूनही रितेश आणि जिनिलिया आपले संस्कार विसरलेले नाहीत.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia)  ही महाराष्ट्राची लाडकी जोडी. चाहते त्यांना आदराने दादा वहिनी म्हणतात.  या जोडीवर त्यांचे चाहते खूप प्रेम करतात. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन ही जोडी कायमच कमाल करत आली आहे. बॉलिवूडमध्ये काम करूनही रितेश आणि जिनिलिया आपले संस्कार विसरलेले नाहीत. त्याच्या वागण्या-बोलण्यातून वेळोवेळी त्याचा प्रत्यय येतो. शिवाय, रितेश ज्याप्रकारे  जिनिलियाचा आदर करतो, ते पाहून तर चाहते कायम त्याचं कायम कौतुक करतात. आता जिनिलियानेदेखील रितेशचं कौतुक केलं आहे. शिवाय, इतर पुरुषांनी रितेशकडून कोणती गोष्ट शिकावी, हेही तिने सांगितलं. 

नुकतंच जिनिलिया हिने श्रेया घोडावत हिच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी रितेशकडून इतरांनी पुरुषांनी कोणती गोष्ट शिकावी? असा प्रश्न जिनिलियाला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "रितेश हा महिलांचा खूप आदर करतो. जेव्हा कधीही माझं शूट असतं, तेव्हा तो घरी थांबतो. सर्व कामे करतो आणि तो मनापासून या सर्व गोष्टी करतो. हे तुझं काम आहे, जे मी करतोय, असं तो कधीच दाखवत नाही. घराबाहेर पडणे आणि काम करणं हाच विचार आताही काही जण करतात. पण, रितेश सर्व काही करतो. मला वाटतं मी खूपच भाग्यवान आहे". 

रितेश व जिनिलिया दोघांच्या बॉण्डिंगचे लाखो चाहते दिवाने आहेत. बॉलिवूडसह मराठीमधील एक आदर्श जोडपं म्हणून बरेचदा या जोडीचं उदाहरण दिलं जातं. जिनिलिया आणि रितेश देशमुख यांचं लग्न 3 फेब्रुवारी 2012 मध्ये झालं होतं. त्याआधी दोघंही ८ वर्ष एकमेकांना डेट करत होते. जिनिलिया रितेशपेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. जिनिलिया ही ख्रिश्चन तर रितेश हा हिंदू असल्याने त्या दोघांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करून मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. हे कपल नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या रितेश बिग बॉस मराठीचे होस्टिंग करतोय. तर जिनिलिया लवकरच  'सितारे जमीन पर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुखसेलिब्रिटीबिग बॉस मराठी