बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान(Arbaaz Khan)ने इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी(Georgia Andriani)सोबत ब्रेकअप केले आहे. ब्रेकअपनंतर जॉर्जियाने एका मुलाखतीत वेगळे होण्याचे कारण सांगितले. तिची स्वतःची ओळख आहे आणि लोकांनी तिला फक्त अरबाजची गर्लफ्रेंड म्हणून ओळखू नये, असे तिचे मत आहे.
अरबाज खान आणि जॉर्जिया अँड्रियानी यांचं ब्रेकअप झालं आहे. नुकतेच जॉर्जियाने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअपवर मौन सोडलं. ती म्हणाली की, आम्हाला दोघांनाही माहित होते की आम्ही एकत्र राहण्यासाठी नाही. ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मला त्याची आठवण येते हे उघड आहे. आम्ही अजूनही मित्र आहोत, पण मला त्याच्यासोबत पुन्हा संबंध ठेवायचे नाहीत. मी याबद्दल बोलत आहे कारण माझी स्वतःची ओळख आहे, लोकांनी मला अरबाजची गर्लफ्रेंड म्हणून ओळखावे असे मला अजिबात वाटत नाही. मी आता खूप चांगल्या ठिकाणी आहे.
आमच्याकडे अनेक अविस्मरणीय क्षण आहेत...जॉर्जिया पुढे म्हणाली की, सध्या आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही नेहमीच एक मजबूत मैत्री शेअर केली आहे. आमची मैत्री इतर मित्रांपेक्षा जास्त घनिष्ठ आहे. आमचे खूप जवळचे नाते होते. आमच्यासोबत अनेक अविस्मरणीय क्षण आहेत. खूप जवळ आल्यानंतर मित्र बनणे खूप आव्हानात्मक आहे. नात्यात अडकून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणे चांगले.
मलायका अरोरा हे ब्रेकअपचे कारण नाहीकाही दिवसांपूर्वी जॉर्जियाच्या ब्रेकअपचे कारण मलायका अरोरा आणि अरबाजची मैत्री असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र काही काळापूर्वी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने या अफवा निराधार असल्याचे म्हटले होते. तिने मुलाखतीत सांगितले होते की, घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायका यांच्या बाँडचा आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मलायकासोबत त्याचे जे नाते होते ते आमच्या नात्याच्या आड आले नाही.
जॉर्जिया आणि अरबाज खान गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्या वयात २२ वर्षांचा फरक होता, जिथे अरबाज ५६ वर्षांचा आहे, तर जॉर्जिया फक्त ३४ वर्षांची आहे.