Join us

मलायका अरोरामुळे झाले जॉर्जिया-अरबाज खानचं ब्रेकअप?, अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:34 IST

अरबाज खान चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो.

बॉलिवूड स्टार अरबाज खान त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कधी अरबाज खानमलायका अरोरामुळे चर्चेत असतो, तर कधी जॉर्जिया एंड्रियानीसोबत दिसतो. जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज अनेक  कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनीही त्यांच्या अफेअरची बातमी कधीच लपवली नाही. अशातच आता जॉर्जिया एंड्रियानीने एक खुलासा केला आहे जो ऐकून सगळे हैराण झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानीने अरबाज खानसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे.

जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खान यांचे प्रेमप्रकरण खूप गाजलं होतं.  याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या दोघांमधील वयाचे अंतर. जॉर्जिया एंड्रियानीची मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीदरम्यान जॉर्जिया एंड्रियानी मलायका अरोराबद्दलही बोलली. जॉर्जिया एंड्रियानीने पिंकविलाशी बोलताना सांगितले की, आता आम्ही दोघे मित्र आहोत. नेहमी चांगले मित्र राहु. सुरुवातीला थोडं कठीण होतं, पण हळूहळू सगळं झालं. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पुढे जॉर्जिया एंड्रियानी म्हणाली की, 'मला अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड म्हटले जाते याचे वाईट वाटते.

या मुलाखतीदरम्यान जॉर्जिया एंड्रियानीला मलायका अरोराबद्दलही विचारण्यात आले. ज्याला उत्तर देताना जॉर्जिया एंड्रियानी म्हणाली की मलायका अरोरामुळे आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही.  अरबाज आणि मला वाटलं की आमचं नातं फारकाळ टिकणार नाही.

टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खानमलायका अरोरा