मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे. लॉकडाऊमध्ये दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहेत. दोघांचं नातं कुणापासून लपवलेले नाही. दोघे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. काहींनी असेही म्हटले की दोघांनीही लग्न केले आहे. या सगळ्यावर जॉर्जियाने नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज १८च्या रिपोर्टनुसार जॉर्जिया एका मुलाखती दरम्यान म्हणाली की, ''तिच्या आणि अरबाजची लग्नाची गोष्ट चुकीची आहे. लोकांना काय विचार करायचे ते करुदेत, मला यात काहीच अडचण नाही. लग्न केले तर याबाबत ती सगळ्यांना सांगेल. पुढे ती म्हणाली, लोकांचा विचार कोण रोखू शकत नाही त्यामुळे त्यांने जो विचार करायचा आहे तो करु देत. आम्ही आधीच बराच वेळ एकत्र घालवला आहे, म्हणून मी त्या चांगल्या प्रकारे ओळखते.''
जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे.