Join us  

'पुष्पा'तील अल्लू अर्जुनचं उदाहरण देत आर. माधवननं अक्षयवर साधला निशाणा, त्यावर खिलाडी कुमार म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 5:30 PM

R Madhavan : ४० दिवसात चित्रपट पूर्ण करणाऱ्यांची आर माधवनने उडवली खिल्ली, त्यावर अक्षय कुमारने उत्तर दिले आहे.

आर. माधवन(R.Madhavan)चा 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) हा चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, माधवनने आपल्या चित्रपटाची तयारी चित्रपट उद्योगाची सद्यस्थिती आणि रिमेकच्या ट्रेंडबद्दल अगदी मोकळेपणाने बोलला आहे. 'रहना है तेरे दिल में' या अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितले आहे की, आता त्याला 'तनु वेड्स मनू'मधून पुन्हा पडद्यावर मनूची भूमिका साकारण्यात रस नाही. काही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की यादरम्यान माधवनने असेही सांगितले की आजकाल कलाकार त्यांच्या चित्रपटांसाठी जास्त वेळ देत नाहीत, असे म्हणत त्याने अक्षय कुमार(Akshay Kumar)वर निशाणा साधला. आता यावर अक्षय कुमारची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

खरेतर आर.माधवनचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये माधवनने ४०-४५ दिवसांत त्यांचे चित्रपट शूट करणार्‍या स्टार्सची तुलना त्यांच्या प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ घेणार्‍या स्टार्सशी करतो आहे. या व्हिडिओमध्ये आर माधवन म्हणतोय, 'पुष्पाप्रमाणेच अल्लू अर्जुनने ते पात्र शेवटपर्यंत सांभाळले आहे. तो अप्रतिम काम करतो आणि नृत्यही. त्यामुळे मला असे वाटते की एका अभिनेत्याची बांधिलकी असते जिथे चित्रपट ३-४ महिन्यांत बनत नाहीत तर वर्षे लागतात.

'रक्षाबंधन' चित्रपटातील 'तेरे साथ हूँ मैं' गाण्याच्या लाँचिंगवेळी माधवनच्या या कमेंटबद्दल अक्षय कुमारला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'माझे चित्रपट संपतात, मी काय करू? आता एक दिग्दर्शक येऊन सांगतो तुमचे काम संपले आहे. मग आता मी त्याच्याशी भांडू का?' या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय देखील उपस्थित होते आणि त्यांनी या प्रकरणी सांगितले की, 'त्यांनी लोकांची दिशाभूल केली आहे की चित्रपट ४०-४५ दिवसात पूर्ण होतो. पण ते तसे नाही. ८०-९० दिवस लागतात.

टॅग्स :आर.माधवनअक्षय कुमारअल्लू अर्जुनपुष्पा