बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला गेली होती. तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. असे वाटतंय की मलायको अरोराची गोवा ट्रिप अद्याप संपलेली नाही आणि अद्याप ती सोशल मीडियावर गोवा ट्रीपचे फोटो शेअर करत असते. मलायकाच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळताना दिसते आहे.
मलायकाने नुकतेच गोवा व्हॅकेशनमधील बिकनीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला लाखो लाइक्स मिळाले आहेत. यात मलायकाच्या अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
मलायकाने बिकनीतील फोटो गोवा व्हॅकेशन दरम्यान सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो एका रात्रीत खूप व्हायरल झाले होते. आतादेखील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.