Join us

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 4:08 AM

भारतीय सैनेला मानवंदना देण्यासाठी “एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्स”हा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहातपार पडला. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष असून या ...

भारतीय सैनेला मानवंदना देण्यासाठी “एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्स”हा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहातपार पडला. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष असून या पुरस्कारांमध्ये मनोरंजन, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक, व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना गौरवण्यात आले. या एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्सचे आयोजन एन पी यादव यांच्या तर्फे करण्यात येते. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनानी करण्यात आली.यंदाचा एंटरटेनमेंट ट्रेड हा अवॉर्ड देण्यासाठी भारतीय पोलीस खात्यातील डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस जम्मू काशमोर आणि सी आई डी सेल  दिल्ली शाहिदा परवीन गांगुली, भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव, ३ दशके कर्करोगीं व त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारे हरखचंद सावळा, जगभरातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी अथकपणे काम करणारे दक्षिण आफ्रिका मध्ये स्थायिक असलेले व्यावसायिक रिझवान अदातिया, दिव्यांगावर मात करून जनसंपर्क क्षेत्रात ३ दशके उत्कृष्ट कामगिरी करणारे राजीव केतकर यांची आदींची निवड करण्यात आली.रवीना टंडन यांना ऍक्शन ऑफ मिशन अवॉर्डने कॅप्टन अमोल यादव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवण्याच्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल कॅप्टन अमोल यादव यांना शाहीदा गांगुली आणि किशोरी शहाणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले., पोलीस खात्यातील पोलादी महिला शाहिदा गांगुली यांना रवीना टंडन  यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले, रिझवान अदातिया यांना ग्लोबल स्टुडन्ट्स मसीहा रिझवान अदातिया यांना किशोरी शहाणेकडून सन्मानित करण्यात आले, कला क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका साकारल्याबद्दल सोनाली कुलकर्णी यांना कॅप्टन अमोल यादव यांच्या हस्ते विशिष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. उद्योगीक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल डी.वाय.पाटील ग्रुपचे डॉ. संजय डी. पाटील यांना शाहिदा गांगुलीकडून पुरस्कारने सन्मानित करण्यात आले, राजू सवाला यांना मृणाल कुलकर्णी आणि श्वेता धनक यांच्या हस्ते किंग ऑफ अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. किशोरी शहाणे यांना शाहिदा गांगुली यांच्याकडून मराठी चित्रपट सुष्टीला योगदान दिल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात केले, शाहिदा गांगुली यांच्या हस्ते मृणाल कुलकर्णी यांना मराठी चित्रपपाटील सर्वात मोहक अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरखचंद सावल्या यांना डॉ. मोनिष बाबरे यांच्या हस्ते यांचे कर्करोग निदानकर्त्याचा तारणहार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक शिंदे यांच्या तर्फे डॉ. मोनिष बाबरे यांनी मल्टी टॅलेंटेड  डॉक्टर पुरस्कार बहाल केला, अशोक शिंदे यांना श्वेता धनक यांच्या हस्ते मराठी चित्रपटचे खरे सेवक या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. अभिनय बेर्डे यांना शाहीदा गांगुली यांच्या हस्ते मराठी चित्रपटसृष्टीत नवीन पदार्पण पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले, श्वेता धनक यांना रवीना टंडन यांच्या हस्ते सामाजिक बांधीलकी महिला उद्योजक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आणि राजीव केतकर यांना जनसंपर्क क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करून लाखो लोकांच्या व्यावसायिकांसाठी प्रेणस्थान या पुरस्कारांने श्वेता धनक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. एन पी यादव म्हणाले की, आम्ही आशा हिऱ्यांना शोधून एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड्स सन्मानित करतो जे आपल्या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करतात तसेच यंदा आम्ही ती फौंडेशनला १००० सॅनिटरी पॅड्स स्त्रियांसाठी देणार आहेत. याव्यतिरिक्त आम्ही हेल्पेज इंडिया जे वृद्धांसाठी काम करते तसेच मूहीम हे एनजीओ लिंग समानता साठी काम करते या एनजीओसाठी देणगी दिली आहे तसेच देशासाठी शहीद सैनिकांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठीही मदत करून अवॉर्ड क्षेत्रात नवीन ठसा उमटवला आहे.देशभक्ती हा या कार्यक्रमाचा विषय असल्यामुळे सादरीकरणाद्वारे देशभक्तीची भावना जागृत करण्यात आली व पुरस्काराच्या या कार्यक्रमात प्रथमच सैनिकांनाही सन्मानित करण्यात आले. याशिवाय मराठा रेजिमेन्टला २५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपले सैनिक जे निस्वार्थ पणे दिवस रात्र आपल्यासाठी काम करतात त्यांच्या साठी छोटीशी मानवंदनाही देण्यात आली. एन पी यादव यांच्या “टॉप १० हिरो आणि हिरोइन्स” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण किशोरी शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या कलाकारांच्या गाजलेल्या गाण्यांवर सादरीकरून त्याना मानवंदना प्रसिद्ध नायक मयुरेश पेम, एबिसिडी व डीआयडी चे सुप्रसिद नृत्यदिग्दर्शक सुशांत पुजारी व नायिका मनीषा केळकर व अंकिता तारे यांनी दिली. तसेच मोबाइलच्या जास्त वापरामुळे मुले मैदानी खेळ विसरलेत व त्याचा होणारा परिणाम हा विषय लहान मुलांच्या सादरीकरणद्वारे सादर करण्यात आला