Godhra: Accident Or Conspiracy Movie Teaser:गुजरातमध्ये 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्राहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनला आग लागली होती, ज्यात 59 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेवर काही दिवसांपूर्वी एक डॉक्यूमेंट्री आली होती, ज्यामुळे देशभरात मोठा वाद झाला. आता यावर चित्रपट बनवला जात आहे. या चित्रपटाचे नाव 'गोध्रा: अपघात की षड्यंत्र' (Godhra: Accident Or Conspiracy) असे असून त्याचा टीझरही रिलीज झाला आहे.
संबंधित बातमी- ‘250 तरुणी जाळ्यात अडकल्या’, काश्मीर फाईल्स आणि केरळ स्टोरीनंतर "अजमेर 92" ची चर्चा
एमके शिवाक्ष Godhra: Accident Or Conspiracy चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर बीजे पुरोहित आणि राम कुमार पाल निर्मिती करणार आहेत. चित्रपटाच्या कलाकारांशी संबंधित माहिती अद्याप निर्मात्यांनी दिलेली नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही.
1 मिनिट 11 सेकंदाच्या टीझरमध्ये काय आहे?चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा टीझरमध्ये करण्यात आला आहे. टीझरची सुरुवात ट्रेनच्या व्हिज्युअलने होते आणि त्यानंतर ट्रेनला आग लागल्याचे दाखवण्यात आले आहे. टीझरमध्ये एक फाईलही दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये नानावटी मेगाटा कमिशन लिहिले आहे.
निर्मात्यांचे मोठे दावे निर्मात्यांनी दावा केलाय की, त्यांनी चित्रपटासाठी कठोर परिश्रम केले आणि हा चित्रपट बनवण्यापूर्वी पाच वर्षे संशोधन केले आहे. यूट्यूबवर टीझर शेअर करताना दावा करण्यात आला आहे की, संशोधनादरम्यान अनेक आश्चर्यकारक तथ्ये समोर आली आहेत, ज्यांचा चित्रपटात समावेश करण्यात आला आहे.
संबंधित बातमी- '...तर भारत 35 वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता', 'सावरकर' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज
काय आहे गोध्रा कांड?2002 च्या घटनेत साबरमती ट्रेनच्या S6 क्रमांकाच्या बोगीला आग लागली होती. गोध्रा स्टेशनवरुन ट्रेन सुरू होताच ट्रेनची साखळी ओढली गेली आणि ट्रेन थांबली. यानंतर रेल्वेवर दगडफेक करण्यात आली आणि एका डब्याला आग लावण्यात आली. या घटनेनंतर दंगली सुरू झाल्या आणि शेकडो लोक मरण पावले. या प्रकरणात अनेकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.