चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!! अदनान सामी करतोय अॅक्टिंग डेब्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2017 8:25 AM
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील ‘भर दो मेरी झोली’ म्हणणारा ‘कव्वाल’ आठवत असेलच! होय, अदनान सामी ही कव्वाली गाताना ...
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील ‘भर दो मेरी झोली’ म्हणणारा ‘कव्वाल’ आठवत असेलच! होय, अदनान सामी ही कव्वाली गाताना दिसला होता. अर्थात ही कव्वाली अदनानचा अॅक्टिंग डेब्यू, असे म्हणता येणार नाही. पण आता अदनानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अदनान लवकरच अॅक्टिंग डेब्यू करणार आहे. होय, ‘अफगान : इन सर्च आॅफ अ होम’ या चित्रपटात अदनान एका अफगाणी गायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ड्रामा, इमोशन्स आणि म्युझिकचे ‘परफेक्ट कॉम्बिनेशन’ असलेला हा चित्रपट राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित केलेला आहे.राधिका आणि विनयसोबत अदनानचे दशकभरापासूनचे संबंध आहेत. राधिका व विनयच्या ‘लकी’ या चित्रपटाला अदनानने संगीत दिले होते. आता राधिका व विनयच्या ‘अफगान : इन सर्च आॅफ अ होम’ आगामी चित्रपटात अदनान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘अफगान : इन सर्च आॅफ अ होम’ हा चित्रपट एका अफगाणिस्तानातील शरणार्थी गायकाची कथा आहे. आपल्या देशातून हा गायक भारतात येतो. भारतात या शरणार्थी गायकाला अनेक रूपात प्रेम सापडते. येत्या आॅगस्टमध्ये याचे शूटींग सुरु होत आहे. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होणार आहे.ALSO READ : अदनान सामीला कन्यारत्न, ट्विटरवर सांगितले नाव!सर्रास ब्लॅक टी शर्ट आणि जीन्समध्ये दिसणारा अदनान या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सूक आहे. मी आत्तापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये कॅमेरा फेस केला आहे. पण चित्रपटात एक पात्र साकारणे, हा पूर्णत: वेगळा अनुभव आहे. माझी पाळेमुळे अफगाणिस्तानाशी जुळलेली आहेत. त्यामुळे मी हे पात्र मला जवळचे वाटले. मला राधिका व विनयने चित्रपटाची कथा ऐकवली आणि मला ती आपलीच वाटली. मी या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रचंड उत्सूक आहे, असे अदनान यानिमित्ताने म्हणाला.