GOOD NEWS : फरदीन खान दुस-यांदा होणार बाप!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2017 6:18 AM
बॉलिवूड अभिनेता फरदीन खान बॉलिवूडमधून गायब आहे. पण म्हणून त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. आता तर फरदीनच्या चाहत्यांसाठी ...
बॉलिवूड अभिनेता फरदीन खान बॉलिवूडमधून गायब आहे. पण म्हणून त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. आता तर फरदीनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, फरदीन दुस-यांदा बाप होणार असल्याची खबर आहे. फरदीनची पत्नी नताशा तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजते. तूर्तास नताशा आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये आहे. येथेच ती आपल्या बाळाला जन्म देणार आहे. फरदीनही आपल्या पत्नीसोबत लंडनमध्ये होता. पण काही दिवस नताशासोबत राहिल्यानंतर तो भारतात परतला आहे. फरदीन खान व नताशा यांचा विवाह २००५ मध्ये झाला होता. या दोघांची तीन वर्षांची एक मुलगी आहे. नताशा दुसºयांदा आई बनणार, या बातमीने फरदीनसोबतच अख्खे कुटुंबीय आनंदात आहे. अलीकडच्या काळात फरदीन बॉलिवूडमध्ये दिसलेला नाही. एकेकाळी बॉलिवूडचा सगळ्यात स्मार्ट अॅक्टर म्हणून तो ओळखला जायचा. पण काही चित्रपटानंतर करिअरला उतरली कळा लागली ना लागली तसा फरदीन मोठ्या पडद्यापासून दूर झाला.ALSO READ : वाढत्या वजनावरून फरदीन संतापला !!काही दिवसांपूर्वी अचानक तो चर्चेत आला. वाढलेल्या वजनातील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. गोलमटोल फरदीनचे हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. यानंतर फरदीन सलमान खानसोबत ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलमध्ये दिसणार, अशी बातमी आली. यात फरदीन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचेही ऐकवात आले.‘नो एन्ट्री’ अनीस बज्मी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये सलमानशिवाय अनिल कपूर आणि फरदीन खान यांचा डबलरोल असल्याचे समजते. यातील हिरोईनचे नाव अद्याप फायनल झालेले नाही. चित्रपटाचे प्रोड्यूसर बोनी कपूर यांनी अलीकडे एका मुलाखतीत ‘नो एन्ट्री’चा सीक्वल जरूर येणार, असे म्हटले होते. अर्थात याचे शूटींग कधी सुरु होईल, याचा अंदाज नाही.