Join us

'रॉकी भाई'च्या चाहत्यांसाठी खुशखबर..! KGF 3 संदर्भात मोठी बातमी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 17:10 IST

Yash : साऊथचा सुपरस्टार यश आज ३७वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्याच्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना मोठे सरप्राईज मिळाले आहे.

साऊथचा सुपस्टार यश (Yash) स्टारर KGF Chapter 2 हा २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. पॅन इंडिया कन्नड चित्रपटाने देशात तसेच परदेशात जबरदस्त कलेक्शन केले. रॉकी भाईची क्रेझ असलेले चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यशचा आज वाढदिवस असून या निमित्ताने रॉकी भाईच्या चाहत्यांना मोठे सरप्राईज मिळाले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त केजीएफ चित्रपटासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

यशच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट शेअर करण्यात आली. यशला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना, KGF 2च्या निर्मात्यांनी KGF 3चे संकेत दिले आहेत. याशिवाय काही रिपोर्ट्समध्ये असेही बोलले जात आहे की KGF 3 चे शूटिंग २०२५ मध्ये सुरू होऊ शकते. होमएबल फिल्म्सचे ट्विट पाहिल्यानंतर 'रॉकी भाई' सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे.

KGF हा देशातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. केजीएफ चित्रपटाच्या दोन्ही भागांनी देश-विदेशात चांगला व्यवसाय केला. KGF 2 ने जगभरात १२१० कोटी रुपयांची कमाई केली तर, दोन्ही भागांची कमाई १५०० कोटींच्या घरात आहे. KGF चा पहिला भाग २०१८ मध्ये रिलीज झाला होता. आता चाहते केजीएफ ३ची आतुरतेने वाट पाहत आहेत.  

‘रॉकी भाई’ला यश म्हणून सगळं जग ओळखत असलं तरी, त्याचं खरं नाव वेगळंच आहे. यशचं पूर्ण नाव नवीन कुमार गौडा असून त्याचा जन्म कर्नाटकात झाला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यशने बंगळूरू गाठत साऊथचे प्रसिद्ध नाटककार बीव्ही करणनाथ यांच्या थिएटरमध्ये सहभागी झाला. तिथेच त्याने अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर त्याने मालिका विश्वातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. ‘नंदा गोकुल’ या साऊथ मालिकेत यशने काम केले होते. तसेच त्याने अनेक जाहिरातींमध्येही काम केले. यानंतर २००७ मध्ये त्याने ‘जम्बाडा हुदुगी’ या कन्नड चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, ‘केजीएफ’ या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले. अभिनयासोबत यश सामाजिक कार्यात देखील सक्रीय आहे. यश आणि त्याची पत्नी राधिका पंडितने २०१७ मध्ये स्वतःची संस्था सुरू केली. या संस्थेतून ते अनेक गरजू लोकांची ते मदत करतात.

टॅग्स :यशयशकेजीएफ