अभिनेत्री नेहा धूपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांच्या घरी एका गोंडस कन्यारत्नाने जन्म घेतला आहे. होय, आज मुंबईच्या एका रूग्णालयात नेहाने मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही स्वस्थ आहेत.याचवर्षी १० मे रोजी नेहा व अंगदचे लग्न झाले. लग्नाआधीचं नेहा प्रेग्नंट होती. त्यामुळे दोघांनीही घाईघाईत लग्न उरकले. अर्थात यादरम्यान आपल्या प्रेग्नंसीची गोष्ट तिने जगापासून लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. अंगद व नेहाने इतके महिने प्रेग्नंसी का लपवली, हे कळायला मार्ग नव्हता. पण एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वत: यामागचे कारण सांगितले होते. सुरूवातीला मी लोकांपासून जाणीवपूर्वक प्रेग्नंसीची गोष्ट लपवली. कारण लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, अशी भीती मला होती. प्रोड्यूसर आणि डायरेक्टर मला काम देणे बंद तर करणार नाही, अशीही भीती मला होती. एक चांगली गोष्ट म्हणजे, सुरूवातीच्या सहा महिन्यांपर्यंत माझे बेबी बम्प दिसले नाही. याचा मला फायदा झाला. माझी एनर्जी लेवल खूप चांगली आहे. मी यादरम्यान ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल्ड बाय नेहा’चे शूटींग संपवले,असे तिने सांगितले होते.नेहा धूपिया आणि अंगद बेदीने लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये रॅम्पवॉक केला होता. बेबी बम्पसोबत तिचा हा पहिला रॅम्पवॉक होता. हा ट्रेंड करिना कपूरने सेट केला होता. नेहाने त्याचाच कित्ता गिरवला होता. चार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण तेव्हा नेहा कुण्या दुसºयासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा व अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणा-या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याशिवाय उंगली, पिंक, टायगर जिंदा है या चित्रपटांतूनही तो झळकला होता.
GOOD NEWS ! नेहा धूपिया व अंगद बेदीला कन्यारत्न!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 12:29 PM