Good News : सलमान खानचा ‘सुलतान’ शांघाय चित्रपट महोत्सवात झळकणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 2:13 PM
बॉलिवूडचा सुलतान सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. २०१६ मध्ये आलेला सलमानचा ‘सुलतान’ हा चित्रपट शांघाय आंतरराष्ट्रीय ...
बॉलिवूडचा सुलतान सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. २०१६ मध्ये आलेला सलमानचा ‘सुलतान’ हा चित्रपट शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनीच ही गुड न्यूज ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘सुलतान २० व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. पुढील माहितीसाठी कृपया २० व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कॅलेंडर बघावे.’सलमान आणि अनुष्का शर्मा स्टारर हा चित्रपट कुस्ती या मैदानी खेळावर आधारित आहे. चित्रपटात दोघांनीही पहिलवानाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले असून, सध्या ते ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट कॅटरिना कैफ बघावयास मिळणार आहे. या व्यतिरिक्त त्याचा ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. ‘ट्यूबलाइट’मध्ये सलमान व्यतिरिक्त सोहेल खान आणि चिनी अभिनेत्री जू जू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ईदच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे. भारताप्रमाणेच हा चित्रपट ईदच्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातही रिलीज होणार होता. परंतु पाकचे लोकल डिस्ट्रिब्युटर यांनी या चित्रपटाला विरोध केला. डेक्कन क्रोनिकलच्या रिपोर्टनुसार, भारताप्रमाणेच पाकिस्तानातही सलमान खानचे प्रचंड फॅन्स आहेत. त्यामुळे ईदच्यानिमित्त पाकिस्तानात रिलीज होणाºया चित्रपटांवर ‘ट्यूबलाइट’चा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या चित्रपटाला पाकमध्ये विरोध करण्यात आला आहे. परंतु या चित्रपटाने जगातील कानाकोपºयात धूम उडवून दिली आहे.