Good News : सनी लिओनी बनली आई!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 2:18 PM
दोन दिवसांपूर्वीच सनी लिओनीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये याविषयीच्या बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या. याच अनुषंगाने ...
दोन दिवसांपूर्वीच सनी लिओनीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये याविषयीच्या बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या. याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज सांगत असून, सनी आई बनली आहे. धक्का बसलाय ना, पण हे खरं आहे. सनीने लातूर जिल्ह्यातील एका मुलीला दत्तक घेतले आहे. होय, सनीने जवळपास दोन वर्षे वयाची मुलगी दत्तक घेतली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीचे नाव निशा कौर असून, ती लातूर जिल्ह्यातील आहे. या मुलीला सनीने काही दिवसांपूर्वीच दत्तक घेतले होते. आता त्याबाबतची जाहीर घोषणा केली आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल की, मुलांविषयी सनीने काय वक्तव्य केले होते. एका मुलाखतीत सनीने म्हटले होते की, ‘आता ती तिच्या परिवाराविषयी विचार करीत आहे.’ जेव्हा बेबी डॉल सनीला विचारण्यात आले होते की, तू तुझ्या फॅमिलीविषयी काही प्लॅन करीत आहेस काय? तेव्हा सनीने म्हटले होते की, ‘मी नेहमीपासूनच मुलांविषयी विचार करीत होती. मात्र मला प्रेग्नेंसीची खूप भीती वाटते. त्यामुळे मी याविषयी सध्या तरी काही विचार करीत नाही. शिवाय माझ्याकडे प्रचंड काम असल्याने मी खूप बिझी आहे. मात्र हे मी सांगू शकत नाही की, कधी आणि कुठून माझ्या कडेवर मूल येईल. छायाचित्र सौजन्य : हिंदूस्तान टाइम्ससनीचे हे सूचक वक्तव्य आता खरे ठरले आहे. तिच्या म्हणण्यानुसारच सनीच्या कडेवर अचानक एक सुंदरशी मुलगी आली आहे. असो, सनी आई बनल्याचा तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. एकीकडे सेलिब्रिटी सरोगसीचा आधार घेत असताना, सनी लिओनीने एका अनाथ मुलीला दत्तक घेतले आहे. सनीचे हे औदार्य नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. असो, सनी आई झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक ठरेल यात शंका नाही.