Join us

​‘बाहुबली2’ची प्रतीक्षा करणा-यांसाठी एक आनंदाची बातमी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2017 12:25 PM

‘ कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा?’ आपल्यापैकी बहुतेक जण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास उत्सूक आहात, हे आम्हाला ठाऊक ...

‘ कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा?’ आपल्यापैकी बहुतेक जण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास उत्सूक आहात, हे आम्हाला ठाऊक आहे. यासाठीच प्रतीक्षा आहे ती ‘बाहुबली2’ची.  या चित्रपटाची अगदी आतुरतने प्रतीक्षा करणा-यांसाठी आमच्याकडे एक चांगली बातमी आहे. होय, ‘बाहुबली2’ हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मेकर्सचा प्रयत्न आहे.खरे तर ‘बाहुबली : दी बीगनिंग’ आला तेव्हा त्याचे हिंदी व्हर्जन उण्यापु-या अर्ध्या पे्रक्षकांपर्यंत पोहोचले होते. पण ‘बाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली: दी कनक्लुजन’च्या बाबतीत असे अजिबात होणार नाहीय. कारण ‘बाहुबली2’ मोठ्या प्रमाणात रिलीज केला जाणार आहे. ‘बाहुबली2’  एकाचवेळी भारतात आणि भारताबाहेर प्रदर्शित होणार आहेत. यावेळी त्याचे हिंदी व्हर्जन तामिळ व तेलगू व्हर्जनच्या तुलनेत कितीतरी अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे.या प्रोजेक्टशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘बाहुबली : दी बीगनिंग’च्या हिंदी व्हर्जनची कमाई अपेक्षेपेक्षा बरीच कमी झाली होती. पण त्याचा सीक्वल असलेल्या ‘बाहुबली: दी कनक्लुजन’च्या रिलीजवेळी आधी केलेल्या चुका टाळल्या जाणार आहेत. या सीक्वलकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे यावेळी ‘बाहुबली: दी कनक्लुजन’चे हिंदी व्हर्जन आधीपेक्षा दुप्पट स्क्रीनवर रिलीज होणार आहे. ‘बाहुबली: दी कनक्लुजन’चे हिंदी व्हर्जन रिलीज होतोय, त्यादिवशी अन्य कुठलाही चित्रपट प्रदर्शित होत नाहीय.  याचा लाभही मेकर्सला मिळणार आहे. एकंदर काय तर ‘बाहुबली: दी कनक्लुजन’ बॉक्सआॅफिसवर धम्माल करणार आहे.सन २०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली : दी बीगनिंग’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.  ‘बाहुबली : दी बीगनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांना या चित्रपटाने अपार लोकप्रीयता मिळवून दिली. खांद्यावर विशाल शिवलिंग उचललेला अभिनेता प्रभास पाहून तर चित्रपटरसिक थक्क झाले होते. आता ‘बाहुबली2’पाहण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा? हे जाणून घेण्याची उत्कंठा सिनेप्रेमींना लागली आहे.  या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ‘बाहुबली2’मध्ये मध्यतरानंतर अर्थात क्लायमॅक्समध्ये मिळणार आहे.  या क्लायमॅक्स सीनवर तब्बल 30 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. .