नवी वेबसिरीज ‘रक्तांचल’चा दुसरा भाग रिलीज झाला आहे .करण पटेल, माही गिल, क्रांती प्रकाश झा, निकीतीन धीर, आशिष विद्यार्थी यांच्या प्रमुख भूमिका ‘रक्तांचल’मध्ये आहेत. एमएक्स प्लेयरवर या सिरीजचा जागतिक प्रीमियर ११ फेब्रुवारी २०२२ झाल्यापासून प्रेक्षकांकडून फार मोठा प्रतिसाद या सिरीजला मिळतो आहे.
‘रक्तांचल’या हिंदी वेब सिरीजचे दुसरे पर्व सध्या एमएक्स प्लेयरवर सुरु असून ते एक क्राइम नाट्य आहे. पूर्वांचल, उत्तर प्रदेशात १९८०च्या दशकात जी गुन्हेगारी चालायची त्यावर आधारित ही मलिका आहे. ही तत्कालीन सरकारी कामांच्या निविदांमध्ये जी गुन्हेगारी चालायची त्यावर आधारित अशी वेब सिरीज आहे. वासिम खानच्या गुन्हेगारी जगताची ही कथा असून त्याच्या या गुन्हेगारीला युवा गुन्हेगार विजय सिंग आव्हान देतो आणि त्यावेळी कथेला एक वेगळे वळण लागते. वासिम हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा गुन्हेगार असला तरी विजय हा मनाने चांगला आहे आणि लोकांना जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी करता असतो. मात्र परिस्थिती त्याला गुन्हेगारी विश्वात ढकलते.
कथा जसजशी पुढे सरकते तसतशी निविदांसाठी चाललेली ही लढाई अधिक तीव्र होत जाते आणि त्यापार्श्वभूमीवर राजकारणही आपली भूमिका बजावत असते. त्यातून मग पूर्वांचलमध्ये रक्तरंजीत घटना घडत राहतात. विजय आपले अस्तित्व स्थापित करण्यासाठी खूप काही करतो आणि शेवटी निविदांचा बादशाह बनतो.
या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वामध्ये विजय सिंग (क्रांती प्रकाश झा) जरी वसीम खानबरोबरची (निकीतीन धीर) जरी शेवटची लढाई हरत असला तरी उत्तर प्रदेशातील गुंधेगारी टोळ्यांचे काम काही अजून संपलेले नसते. त्याला गती मिळते ती मुंबई पोलिसांचे एक पथक त्यांच्यापर्यंत पोहोचते तेव्हा. त्यानंतर या सर्व घटनांना अधिक गंभीर वळण प्राप्त होते. त्यातून मग या सर्व गुंड टोळ्यांच्या कक्षा अधिक विस्तृत होतात. त्या कशामुळे, हे पाहणे अधिक रंजक ठरते. ‘रक्तांचल’चे हे दुसरे पर्व हे राजकारणावर सत्तेने मिळविलेल्या प्रभूत्त्वाची आणि त्यापलीकडील गोष्टींची कथा आहे.