Join us

मलायका अरोराच्या 'हॅलो हॅलो' गाण्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:25 IST

'मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये...' असे आपल्या तालावर सर्वांना थिरकायला लावणारी मुन्नी म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देमलायका अरोराचे 'हॅलो हॅलो' आयटम साँग होतेय हिट 'पटाखा' येत्या २८ सप्टेंबरला होणार रिलीज

'मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये...' असे आपल्या तालावर सर्वांना थिरकायला लावणारी मुन्नी म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला तयार झाली आहे. 'बिडी जलई ले', 'नमक इश्क का' अशा भन्नाट गाण्यानंतर विशाल भारद्वाजने आपल्या पटाखा या नवीन चित्रपटातील गाण्यासाठी मलायकाची निवड केली आहे. 'हॅलो हॅलो' या आयटम साँगवर ती डान्स करताना दिसणार आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे.

'पटाखा' या चित्रपटातील 'हॅलो हॅलो' या गाण्यात मलायका अरोरा धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसते आहे. 'पटाखा' चित्रपटातील हे एकमेव गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे युट्यूबवर येताच खूप चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळाला आहे. ९ लाखाहून अधिक प्रेक्षकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. गीतकार गुलजार यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत, तर रेखा भारद्वाज हिच्या आवाजात हे गाणे प्रेक्षकांना ऐकता येणार आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

विशाल भारव्दाज यांचा 'पटाखा सिनेमा चरण सिंग पथिक यांच्या लघुकथेवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाची कथा राजस्थानमधील दोन बहीणींची भवती फिरणारी आहे. बडकी आणि छुटकी नावाच्या दोन बहिणी नेहमी एकमेकींशी भांडत असतात. मात्र लग्न झाल्यावर त्यांना कळते की त्या एकमेकींशिवाय राहु शकत नाही. हा एका कॉमेडी-ड्रामा सिनेमा असणार आहे. यात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सुनील ग्रोव्हर आणि विशाल भारद्वाज पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. येत्या २८ सप्टेंबरला 'पटाखा' रिलीज होणार आहे. 

टॅग्स :मलायका अरोरा